शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
2
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
3
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
4
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
5
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
6
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
7
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
8
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
9
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
10
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
11
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
12
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
13
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
14
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
15
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
16
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
17
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
18
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
19
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
Daily Top 2Weekly Top 5

Accident : कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर करंजाळे वळणावर भीषण अपघात; युवकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 15:20 IST

धडकेचा आवाज एवढा प्रचंड होता की जवळील परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

ओतूर -  कल्याण–अहिल्यानगर महामार्गावर करंजाळे (ता. जुन्नर) येथील वळणावर गुरुवार (दि. ३० ऑक्टोबर) रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात सागर शहाजी चकवे (वय २८, रा. पारगाव, ता. जुन्नर, जि. पुणे) या तरुण चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात इतका भयानक होता की वाहनाचा पुढील भाग पूर्णतः चकनाचूर झाला होता.अधिकच्या माहितीनूसार, एमएच-१४ केए-११४७ या क्रमांकाची पिकअप गाडी बटाटे घेऊन वाशीच्या दिशेने जात होती. करंजाळे वळणावर चालक सागर चकवे याचा वाहनावरील ताबा सुटल्याने पिकअपने रस्त्याच्या कडेला असलेल्या छत्रपती हॉटेलजवळील भीतीला जोरदार धडक दिली. धडकेचा आवाज एवढा प्रचंड होता की जवळील परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.या धडकेनंतर वाहनाचा पुढील भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. सागर चकवे आणि त्याच्यासोबत असलेला क्लिनर गंभीर जखमी झाला होता. घटनास्थळी पोहोचलेल्या ओतूर पोलिसांनी आणि स्थानिक नागरिकांनी दोघांना तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी सागर चकवे याला मृत घोषित केले. या अपघाताची फिर्याद शुभम शंकर ठोंगिरे (रा. मुथाळणे, ता. जुन्नर) यांनी ओतूर पोलीस ठाण्यात दिली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संदीप भोते पुढील तपास करत आहेत.  आपल्या कुटुंबाचा आधारस्तंभ असलेल्या सागरच्या निधनाने मढ पारगाव व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या आकस्मिक निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे या वळणावर तातडीने स्पीड ब्रेकर, चेतावणी फलक, व रस्ता प्रकाशयोजना यांसारख्या सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Fatal Accident on Kalyan-Ahilyanagar Highway Claims Young Man's Life

Web Summary : A young driver died in a tragic accident near Karanjale on the Kalyan-Ahilyanagar highway. His pickup truck crashed into roadside structure. The cleaner was severely injured. Local demand safety measures at the dangerous curve.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेAccidentअपघात