शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधानांचा उपदेश की अपयशाचा पुरावा? देश चालवणं आता तुमच्या..." राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
2
Rohit Pawar : "भ्रष्टाचार करू नका, आता निवडणुका झाल्याने पंतप्रधानांचं आवाहन म्हणजे..."; रोहित पवारांचा निशाणा
3
Jewellery Stocks Fall: पंतप्रधानांचं आवाहन आणि टायटन, सेनको, कल्याण यांना बसला फटका; लग्नसराईच्या हंगामात गोल्ड शेअर्स आपटले
4
‘वाह मोदीजी वाह! देशाला बर्बाद तुम्ही करायचं आणि जबाबदारी मात्र जनतेने घ्यायची?’  विजय वडेट्टीवार यांचा टोला
5
Nepal Plane Fire: नेपाळमध्ये काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! लँडिंग दरम्यान विमानाच्या टायरला आग; २८९ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले
6
थलापती विजयच्या शपथविधीनंतर तृषा कृष्णन गर्दीत अडकली; अभिनेत्रीच्या संयमाचं होतंय कौतुक
7
Canara Bank मध्ये ४४४ दिवसांच्या FD मध्ये २ लाख जमा केल्यास किती मिळेल व्याज, खात्यात एकूण किती रक्कम येईल?
8
कल्याण रेल्वे स्थानक की रेडलाइट एरिया ? मध्यरात्री तीन वाजेपर्यंत बेकायदा धंदे, पोलिसांचे नियंत्रण नाही
9
हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? इन्स्टावर अनफॉलो केलं, MI च्या गोटात काल रात्री असं काही घडलं
10
महामुंबई: मुंबई महापालिका निधी वाटपातील गटबाजीने भाजपमध्येच अस्वस्थता 
11
Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक
12
हंटाव्हायरसचा विळखा! ३ जणांचा मृत्यू झालेल्या क्रूझवरून भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; पुढे काय होणार?
13
केवळ पगारवाढीवर अवलंबून आहात का?; 'ही' ३ कारणे आहेत तुम्ही श्रीमंत होण्यातील अडथळा!
14
'असदुद्दीन ओवेसी हे ओसामा बिन लादेनसारखेच, त्यांच्यात काही फरक नाही', मंत्री नितेश राणेंचे विधान
15
Post Office मध्ये ३६ महिन्यांच्या एफडीमध्ये ₹२,००,००० जमा कराल तर किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
Adhik Maas 2026: अधिक मसात का लावली जाते वेणीमाधव वात? काय आहे वैशिष्ट्य, महत्त्व आणि लाभ? वाचा
17
मोदींचं आवाहन, पेट्रोलियम मंत्र्यांनी मांडलं गणित, देशात पेट्रोल, डिझेलचे दर भडकणार, किमती एवढ्या रुपयांनी वाढणार
18
रील बनवण्याचे वेड अन् दोन प्रियकरांचे लफडे; भरल्या घरात बेसबॉल बॅटने नव्या बॉयफ्रेंडचा खेळ खलास
19
विजयच्या शपथविधी सोहळ्याकडे पत्नी अन् मुलांनी फिरवली पाठ, लेकाने हटवलं वडिलांचं नाव
20
भारतीय रणरागिणींचा सुवर्णवेध! शांघाय तिरंदाजी विश्वचषकात जिंकलं गोल्ड, यजमान चीनचा उडवला धुव्वा
Daily Top 2Weekly Top 5

आरएमसी प्रकल्प परिसरातील नागरिकांनी करायचे तरी काय ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 11:46 IST

- वडगाव येथील नदीकिनारी थाटलेल्या प्रकल्पातील सिमेंट काँक्रीटचा राडारोडा, केमिकलमिश्रित स्लरी थेट मुठा नदीत सोडली जाते.

पुणे : शहरातील रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) प्रकल्प सहा महिन्यांत हद्दीबाहेर काढण्याचे आश्वासन प्रशासनाकडून दिले जात असताना दुसरीकडे मात्र नियम पाळू, पण हद्दीबाहेर जाणार नाही, असा पवित्र पुणे आरएमसी असोसिएशनने घेतला आहे. त्यामुळे प्रकल्पांच्या परिसरातील नागरिक प्रशासन आणि व्यावसायिकांच्या कात्रीत सापडले आहेत. आम्ही आणखी किती दिवस प्रदूषणाचा त्रास सहन करायचा, असा सवाल ते उपस्थित करत आहेत.

शहरातील आरएमसी प्रकल्पामुळे परिसरात धुळीचे आणि फुफाट्याचे साम्राज्य पसरल्याने प्रकल्पांच्या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय या प्रकल्पामुळे हवेचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. वडगाव येथील नदीकिनारी थाटलेल्या प्रकल्पातील सिमेंट काँक्रीटचा राडारोडा, केमिकलमिश्रित स्लरी थेट मुठा नदीत सोडली जाते.

आरएमसी प्रकल्पाच्या समस्येसंदर्भात ‘लोकमत’ वृत्त मालिका चालवली. या वृत्तमालिकेची दखल घेऊन महापालिकेने लोहगाव-खांदवेनगरमधील सात आरएमसी प्रकल्प जमीनदोस्त केले. त्यानंतर १७ एप्रिल रोजी पहाटे वडगाव खुर्द येथील आरएमसी प्रकल्पांवर कारवाई करण्याचे नियोजन केले होते. मात्र, बांधकाम विभागातील एका अधिकाऱ्याने या कारवाईची टीप आरएमसी प्रकल्प मालकांना आणि चालकांना दिली. त्यानंतर राजकीय दबाव आला आणि नियोजित कारवाई अचानक रद्द केली. त्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी अनधिकृत आरएमसी प्रकल्पांवर कारवाई होईल, असे म्हणत महापालिकेच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.

या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त नवल किशोर राम आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत शहराच्या हद्दीतील आरएमसी प्रकल्प सहा महिन्यांत हद्दपार करण्यासह १५ दिवसांत नियमावली आणणे आणि तोपर्यंत कारवाई करायची नाही, असा निर्णय घेण्यात आला. दुसरीकडे पुणे आरएमसी असोसिएशनने पत्रकार परिषद घेऊन प्रशासनाच्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. आम्ही नियम पाळू; पण हद्दीबाहेर जाणार नाही, असा पवित्रा घेतला आहे.

प्रशासनाच्या निर्णयानुसार आणखी सहा महिने प्रकल्पांच्या परिसरातील रहिवासी नागरिकांना धुळीचा व प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागणार आहे. दुसरीकडे राजकीय किंवा असोसिएशनच्या दबावाला प्रशासन बळी पडले तर मग प्रशासन आणि व्यावसायिकांच्या कात्रीत सापडलेल्या नागरिकांनी काय करायचे, असा सवाल उपस्थित होत आहे.

आमरण उपोषण किंवा मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन   
आम्ही केंद्र, राज्य येथील सत्ता पाहून आजवर मतदान केले, पण आज हेच लोकप्रतिनिधी आमच्या जिवावर उठले आहेत. त्यामुळे आम्ही केलेले मतदान फोल ठरले आहे. आम्हाला होणाऱ्या त्रासाबद्दल आम्ही अनेकदा राजकीय मंडळींना व अधिकाऱ्यांना निवेदने दिली, विनवण्या केल्या, मात्र काहीच उपयोग होत नाही. आता यापुढे आम्हाला आरएमसी प्रकल्पामुळे होणाऱ्या त्रासाकडे लक्ष वेधण्यासाठी आमरण उपोषण करावे लागेल किंवा मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करावे लागेल. - लोकेश भावेकर, चेअरमन, प्रयेजा सिटी
 

English
हिंदी सारांश
Web Title : RMC Plant Residents: What Should They Do?

Web Summary : Residents near Pune's RMC plants suffer pollution. Authorities promise relocation, but businesses resist. Caught between promises and pollution, citizens question how long they can endure the health risks.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेair pollutionवायू प्रदूषणMaharashtraमहाराष्ट्र