Join us
Daily Top 2Weekly Top 5

विजयच्या शपथविधी सोहळ्याकडे पत्नी अन् मुलांनी फिरवली पाठ, लेकाने हटवलं वडिलांचं नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 10:08 IST

इकडे मुख्यमंत्रिपदाची शपथ, तिकडे वैयक्तिक आयुष्य आलं चव्हाट्यावर

दाक्षिणात्य सुपरस्टार थलापती विजयने १० मे २०२६ रोजी तामिळनाडूच्यामुख्यमंत्री पदाची शपथ घेत राजकारणातील आपल्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. अभिनेता थलापति विजय अशी ओळख त्याची ओळख आतापर्यंत होती. मात्र आता तो तामिळनाडूचामुख्यमंत्री बनला आहे. या पदावर पोहचच त्याने इतिहास रचला आहे. मात्र त्याच्या शपथविधी सोहळ्याला त्याचे आपले लोक म्हणजेच त्याची पत्नी आणि मुलं यांची अनुपस्थिती होती. तर दुसरीकडे अभिनेत्री त्रिशा कृष्णन आवर्जुन हजर होती. सध्या विजय आणि त्रिशाच्या अफेअरची जोरदार चर्चा आहे.

शपथविधी सोहळ्याला पत्नी आणि मुलांनी फिरवली पाठ

मुख्यमंत्री पदाची शपथ घेणे हा त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वात खास क्षण असतो आणि अशा वेळी संपूर्ण कुटुंब सोबत असणे अपेक्षित असते. विजयच्या शपथविधी सोहळ्याला त्याची आई आणि कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते, परंतु त्याची पत्नी संगीता आणि मुले कुठेही दिसले नाहीत. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी यावरुन बरीच चर्चा केली.

थलापती विजय आणि संगीता सोरनलिंगम यांचा विवाह २५ ऑगस्ट १९९९ रोजी झाला होता. संगीता ही विजयची खूप मोठी चाहती होती आणि पहिल्या भेटीतच ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते. मात्र, आता २७ वर्षांनंतर दोघांनी घटस्फोट जाहीर केला. संगीताने घटस्फोटासाठी अर्ज केला असून विजयवर विवाहबाह्य संबंध आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप केले. विजय निवडणूक लढवत असतानाच त्याच्या वैयक्तिक आयुष्यात अशा प्रकारे वादळ आलं. तसंच त्रिशा कृष्णनसोबत त्याची पुन्हा जवळीक बघायला मिळाली. 

मुलाने हटवले वडिलांचे नाव

घटस्फोटाच्या या प्रकरणाचा परिणाम विजयच्या मुलांवरही झाला आहे. विजय आणि संगीता यांना जेसन संजय आणि दिव्या साशा ही दोन मुले आहेत.  मुलगा जेसन संजयने आपल्या नावापुढील वडिलांच्या नावाचे अद्याक्षर 'V' हटवून आईच्या नावाचे 'S' लावले आहे. मुलाच्या या निर्णयामुळे विजयच्या कुटुंबातील वाद किती टोकाला गेला आहे, हे स्पष्ट होत आहे. घटस्फोटाची प्रक्रिया सुरू झाल्यापासून संगीता आणि मुले विजयपासून वेगळे राहत आहेत. विजयच्या कोणत्याही मोठ्या कार्यक्रमात किंवा कौटुंबिक सोहळ्यात गेल्या काही काळापासून त्यांची उपस्थिती दिसलेली नाही. या प्रकरणावर विजय किंवा त्याच्या कुटुंबाकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही, तरीही सोशल मीडियावर त्यांच्यातील दुराव्याची चर्चा थांबलेली नाही.

तृषा कृष्णनसोबतच्या अफेअरची चर्चा

पत्नीपासून वेगळे होण्यामागे अभिनेत्री तृषा कृष्णनसोबतचे विजयचे संबंध असल्याचे बोलले जात आहे. विजय आणि त्रिशा रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा तमिळ सिनेसृष्टीत नवीन नाहीत. जरी या दोघांनीही आपल्या नात्याला नेहमीच मैत्रीचे नाव दिले असले, तरी त्यांच्यातील जवळीक अनेकदा चर्चेचा विषय ठरते. तामिळनाडू निवडणुकीत विजयच्या पक्षाने १०७ जागा जिंकल्यानंतर त्रिशा त्याला शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या घरी पोहोचली होती. इतकेच नाही तर १० मे रोजी झालेल्या शपथविधी सोहळ्यातही त्रिशा विजयच्या आईसोबत बसलेली दिसली. विजयने मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर  त्रिशाने त्याच्या आईला मिठी मारल्याचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 'मी या दिवसाची आतुरतेने वाट बघत होते' अशी प्रतिक्रिया तिने दिली. थलापती विजयचा 'जना नायकन' हा शेवटचा सिनेमा काही दिवसात रिलीज होणार आहे. विजयने यानंतर अभिनयातून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Vijay Sworn In as CM; Wife, Kids Absent, Affair Rumors Swirl

Web Summary : Thalapathy Vijay's CM oath ceremony was marked by family absence and affair rumors. His wife and children were not present, while actress Trisha was. Divorce and Vijay's son dropping his father's initial add to the turmoil.
टॅग्स :थलपती विजयतामिळनाडूमुख्यमंत्री