शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

Pune: रस्त्यावर पिचकारी मारणाऱ्या अतिहुशार लोकांना महापालिकेचा दणका; ४ महिन्यांत ६९ लाखांचा दंड वसूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 10:37 IST

सार्वजनिक जागी थुंकणे, लघवी करणे, कचरा जाळणे, कचऱ्याचे सुका आणि ओला असे वर्गीकरण न करणे, नदीत राडारोडा टाकणे अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार

पुणे : पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने सार्वजनिक जागी थुंकणे, कचरा जाळणे, अस्वच्छता करणे, अशा कारणांसाठी दंडात्मक कारवाई केली जाते. त्यानुसार गेल्या चार महिन्यांत ११ हजार ०४७ लोकांना दंड करत ६९ लाख ३६ हजार ५४९ रुपयांचा दंड वसूल केला आहे. त्यामुळे नागरिकांना पिचकारी मारणे महागात पडणार आहे.

पुणे महापालिकेने सार्वजनिक जागी स्वच्छता राखण्यासाठी स्वच्छता उपविधी तयार केली आहे. त्या नियमानुसार अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांस दंडात्मक कारवाई केली जाते. यामध्ये सार्वजनिक जागी थुंकणे, लघवी करणे, कचरा जाळणे, कचऱ्याचे सुका आणि ओला असे वर्गीकरण न करणे, नदीत राडारोडा टाकणे, अशा गोष्टींचा समावेश आहे. यासाठी १८० रुपयांपासून ते पाच हजार रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याबाबद्दल ७७ लोकांकडून ७७ हजार दंड वसूल करण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी लघवी करणाऱ्या २ हजार ४४५ जणांकडून ४ लाख ८९ हजार रुपये वसूल केले. कचरा जाळणाऱ्या १२ लोकांकडून ६० हजार वसूल करण्यात आले. कचऱ्याचे वर्गीकरण न केल्याबद्दल ९०७ लोकांकडून २ लाख ४२ हजार ४०० रुपये वसूल करण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्या ७ हजार १४७ लोकांकडून ३८ लाख १९ हजार ८८४ रुपये वसूल करण्यात आले. बल्क वेस्ट जनरेटर कचरा प्रक्रिया प्रकल्प बंदबाबत ३६ जणांकडून १ लाख ८० हजार ४०० रुपये वसूल केले. बांधकाम राडारोडा टाकणाऱ्या ७६ लोकांकडून ५ लाख ४८ हजार २०० रुपये वसूल करण्यात आले आहेत. २७८ लोकांवर प्लास्टिकबद्दल कारवाई करत १४ लाख २० हजार वसूल करण्यात आले. त्यांच्याकडून ९९४ किलो प्लास्टिक जमा करण्यात आले आहेत. या प्रकारे ११ हजार ०४७ लोकांना दंड करत महापालिकेने ६९ लाख ३६ हजार ५४९ रुपयांचा दंड वसूल केला आहे.

सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवणे ही नागरिकांचीही जबाबदारी आहे. त्यामुळे नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, अस्वच्छता करणे, कचरा जाळणे, या गोष्टी करून नयेत; अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल. – अविनाश संकपाळ, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग, महापालिका

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Municipality Fines Spitting Offenders ₹69 Lakhs in Four Months

Web Summary : Pune Municipality collected ₹69 lakhs in fines from 11,047 people over four months for public offenses like spitting, littering, and burning waste. Strict actions ensure public cleanliness, with fines ranging from ₹180 to ₹5,000 based on the offense.
टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाHealthआरोग्यenvironmentपर्यावरणpollutionप्रदूषणSocialसामाजिक