पुणे महापालिकेत रिव्हॉल्वर डोक्याला लावणे चांगलेच भोवले; धमकी देणाऱ्यावर अखेर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 16:04 IST2026-02-14T16:03:42+5:302026-02-14T16:04:50+5:30

माझ्याकडे परवाना असलेले रिव्हाॅल्वर आहे, असे सांगून आरोपीने खिशातून रिव्हाॅल्वर काढून स्वत:च्या डोक्याला लावले.

Pune Municipal Corporation: A revolver was pointed at a person's head and a case was finally registered against the person who made the threat. | पुणे महापालिकेत रिव्हॉल्वर डोक्याला लावणे चांगलेच भोवले; धमकी देणाऱ्यावर अखेर गुन्हा दाखल

पुणे महापालिकेत रिव्हॉल्वर डोक्याला लावणे चांगलेच भोवले; धमकी देणाऱ्यावर अखेर गुन्हा दाखल

पुणे : जादा कर आकारणी केल्याचा आरोप करून महापालिकेच्या कर आकारणी विभागात रिव्हाॅल्वर डोक्याला लावून आत्महत्येची धमकी देणाऱ्याच्या विरोधात शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. शुक्रवारी (दि. १३) दुपारी कर आकारणी विभागाच्या कार्यालयात ही घटना घडली. महेंद्र नरसिंग लोणकर (रा. कोंढवा खुर्द) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत महापालिकेच्या कर आकारणी विभागातील कर्मचारी गणेश दिलीप ठोंबरे (३७, रा. कात्रज) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शुक्रवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास महापालिकेच्या कर आकारणी विभागात आला होता. जादा मिळकत कर आकारण्यात आल्याचा आरोप करून कर आकारणी विभागाच्या कार्यालयातून उडी मारण्याची धमकी दिली. माझ्याकडे परवाना असलेले रिव्हाॅल्वर आहे, असे सांगून आरोपीने पँटच्या खिशातून रिव्हाॅल्वर काढून स्वत:च्या डोक्याला लावले. रिव्हाॅल्वर काढून त्याने आत्महत्या करण्याची धमकी दिल्याचे ठोंबरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक वलसे करत आहेत.

महापालिकेचे नवे सभागृह अस्तित्वात आल्यानंतर महापालिकेत नवख्या नगरसेवकांचा आणि त्यांच्या नवनवीन वाहनांचा जसा वावर वाढला आहे, तसाच पिस्तूल बाळगणाऱ्या कार्यकर्त्यांचाही वावर वाढला आहे. मिळकत कर थकबाकीच्या प्रकरणी महापालिकेत चकरा मारणाऱ्या एकाने पिस्तूल काढून थेट स्वत:च्या डोक्याला लावल्याची घटना शुक्रवारी दुपारी महापालिकेतील मिळकत कर विभागाच्या कार्यालयात घडली. या घटनेची महापालिका आयुक्तांनी गंभीर दखल घेतली असून संबंधीतावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

महापालिकेतील चार वर्षाच्या प्रशासकराज नंतर नुकतेच महापालिका सभागृह अस्तित्वात आले आहे. महापालिकेच्या निवडणुकीत १६५ पैकी जवळपास शंभर नगरसेवक नवखे असून पहिल्यांदाच महापालिकेच्या सभागृहात पोहचले आहेत. नवीन नगरसेवकांमध्ये काही गुंठा मंत्र्यांचाही समावेश असल्याने ते आणि त्यांचे कार्यकर्ते महागड्या गाड्यांमधून महापालिकेत येतात. त्यामुळे महापालिकेच्या परिसरात नवनवीन आणि महागड्या गाड्यांचा वावर दिसतो. एकीकडे हे चित्र असताना, दुसरीकडे पिस्तूलधारक कार्यकर्त्यांचाही वावर वाढलेला दिसत आहे. महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीवेळी काही कार्यकर्त्यांच्या कमरेला पिस्तूल सदृष्य वस्तू पहायला मिळाल्या.

Web Title : पुणे: निगम कार्यालय में रिवॉल्वर से धमकी, आरोपी गिरफ्तार

Web Summary : पुणे नगर निगम में कर निर्धारण को लेकर रिवॉल्वर से आत्महत्या की धमकी देने पर एक व्यक्ति गिरफ्तार। घटना चुनाव के बाद हथियारों की बढ़ती उपस्थिति को दर्शाती है।

Web Title : Pune: Revolver Threat at Corporation Office Leads to Arrest

Web Summary : Man arrested for threatening suicide with a revolver at Pune Municipal Corporation over tax assessment. Incident highlights increased presence of weapons post-election.