लोणावळा :पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील डोंगरगाव-कुसगाव येथे पुलाचे शटरिंग काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासोबत रंगकामही करण्यात येणार आहे. त्यामुळे द्रुतगती मार्ग दोन दिवस प्रत्येकी तीन तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात वाहतूक वळविण्यात येणार आहे.महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत द्रुतगती मार्गावरील डोंगरगाव-कुसगाव येथे पुलाचे शटरिंग काढण्याचे आणि रंगाचे काम करण्यात येत आहे. त्यासाठी काही काळ वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईकडे जाणारी वाहतूक २३ एप्रिल रोजी दुपारी १२ ते ३ या वेळेत पूर्णपणे बंद राहणार आहे. या कालावधीत सर्व वाहने किवळे-देहूरोड-तळेगावमार्गे राष्ट्रीय महामार्ग ४८ वरून कुसगाव टोल प्लाझा येथे वळविण्यात येणार आहेत. तसेच, पुण्याकडे येणारी वाहतूक २४ एप्रिल रोजी दुपारी १२ ते ३ या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे. त्यावेळी वाहनांना कुसगाव टोल प्लाझामार्गे राष्ट्रीय महामार्ग ४८ वरून देहूरोड -किवळेमार्गे पुण्याकडे वळविण्यात येईल.
या पार्श्वभूमीवर वाहनचालकांनी प्रवासाचे नियोजन करून पर्यायी मार्गांचा वापर करावा. संबंधित कालावधीत काही अडचण आल्यास नियंत्रण कक्ष किंवा महामार्ग पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
Web Summary : The Pune-Mumbai Expressway will be closed for three hours on April 23rd and 24th due to bridge maintenance. Traffic will be diverted via alternate routes during the closure. Motorists are advised to plan accordingly and contact authorities for assistance.
Web Summary : पुल रखरखाव के कारण पुणे-मुंबई एक्सप्रेसवे 23 और 24 अप्रैल को तीन घंटे के लिए बंद रहेगा। इस दौरान ट्रैफिक वैकल्पिक मार्गों से परिवर्तित किया जाएगा। वाहन चालकों को सलाह दी जाती है कि वे उसी अनुसार योजना बनाएं और सहायता के लिए अधिकारियों से संपर्क करें।