Pune Mayor: पुणे महापौर, उपमहापौरपदाचा उमेदवार कोण? काँग्रेस शर्यतीत उतरले, राष्ट्रवादीही उमेदवार देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 13:56 IST2026-02-03T13:55:21+5:302026-02-03T13:56:09+5:30

Pune Mayor काँग्रेसकडून येरवडा - गांधीनगर भागाच्या नगरसेविका अश्विनी लांडगे महापौरपद तर वानवडी भागातून साहिल केदारी हे उपमहापौरपदाच्या शर्यतीत उतरले असून राष्ट्रवादी सुद्धा उमेदवार देणार असल्याची माहिती समोर आली आहे

Pune Mayor Who is the candidate for the post of Pune Mayor and Deputy Mayor? Congress enters the race, NCP will also field a candidate | Pune Mayor: पुणे महापौर, उपमहापौरपदाचा उमेदवार कोण? काँग्रेस शर्यतीत उतरले, राष्ट्रवादीही उमेदवार देणार

Pune Mayor: पुणे महापौर, उपमहापौरपदाचा उमेदवार कोण? काँग्रेस शर्यतीत उतरले, राष्ट्रवादीही उमेदवार देणार

पुणे : पुणे महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी ९ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. यासाठी मंगळवारी (दि. ३) उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. महापालिकेत भाजप सर्वात मोठा पक्ष असल्याने त्यांचाच महापौर व उपमहापौर होणार हे निश्चित आहे. महापौरपदाच्या शर्यतीत अखेर मंजुषा नागपुरे यांचे नाव आघाडीवर आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब केल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. तर उपमहापौर पदासाठी परशुराम वाडेकर उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. अशातच आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसही या महापौर आणि उपमहापौरपदाच्या शर्यतीत उतरले आहे.  

काँग्रेसकडून येरवडा - गांधीनगर भागाच्या नगरसेविका अश्विनी लांडगे महापौरपद तर वानवडी भागाचे साहिल केदारी हे उपमहापौरपदाच्या शर्यतीत उतरले आहेत. त्यामुळे महापौर व उपमहापौरपदाचा उमेदवार कोण असणार? एवढीच औपचारिकता बाकी आहे. नुकतेच झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपने १६५ पैकी ११९ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे महापौर आणि उपमहापौरपद निवडीची केवळ औपचारिकता आहे. महापौरपद सर्वसाधारण गटातील महिलेसाठी राखीव आहे. या पदासाठी चाैथ्यांदा नगरसेविका झालेल्या वर्षा तापकीर, रंजना टिळेकर यांच्यासह तिसऱ्यांदा नगरसेविका झालेल्या मंजूषा नागपूरे, स्मिता वस्ते आणि मानसी देशपांडे यांची नावे चर्चेत होती. पण अखेर भाजपकडून मंजुषा नागपुरे आणि परशुराम वाडेकर यांना संधी देण्यात आली आहे. तर काँग्रेसकडून अश्विनी लांडगे आणि साहिल केदारी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.  

 दुसरीकडे पहिल्या अडीच वर्षांच्या कालावधीत तीन महिलांना प्रत्येकी दहा महिने हे पद देण्याचा फॉर्म्युलाही ऐनवेळी वापरण्यात येऊ शकतो, अशी शक्यता भाजपच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून या दोन्ही पदांसाठी उमेदवार देण्यात आला आहे. तसेच भाजपचा राज्यातील मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसकडून या निवडणुकीसाठी उमेदवारी द्यायचा की नाही? यावरून रात्री उशिरापर्यंत खल सुरू होता. परंतु राष्ट्रवादी सुद्धा उमेदवार देणार असल्याची माहिती समोर आली आहे.  

Web Title : पुणे महापौर चुनाव: भाजपा की जीत संभव; कांग्रेस, राकांपा भी मैदान में

Web Summary : पुणे महापौर चुनाव में भाजपा की नागपुरे प्रबल दावेदार हैं। कांग्रेस और राकांपा भी उम्मीदवार उतार रही हैं, जिससे मुकाबला भाजपा के बहुमत के बावजूद चुनौतीपूर्ण है।

Web Title : Pune Mayor Election: BJP Likely Winner; Congress, NCP Also Contest

Web Summary : Pune's mayoral election sees BJP's Nagpure favored. Congress and NCP are also fielding candidates, making it a contested race despite BJP's majority.