पुणे इंटरसिटी एक्स्प्रेसच्या डब्याला कर्जतजवळ आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 11:04 IST2025-02-15T11:03:20+5:302025-02-15T11:04:02+5:30
पुणे : पुणे -मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेसच्या डब्याला शुक्रवारी सायंकाळी कर्जतजवळ पळसदरी येथे आग लागल्याची घटना घडली. या आगीमुळे प्रवाशांमध्ये ...

पुणे इंटरसिटी एक्स्प्रेसच्या डब्याला कर्जतजवळ आग
पुणे : पुणे-मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेसच्या डब्याला शुक्रवारी सायंकाळी कर्जतजवळ पळसदरी येथे आग लागल्याची घटना घडली. या आगीमुळे प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली.
प्रवाशांनी चेन पुलिंग करून गाडी थांबविली. आग विझवल्यानंतर गाडी रवाना झाली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पुणे-मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेसच्या इंजिनपासून पाठीमागील दुसऱ्या व तिसऱ्या डब्याच्या खाली ही आग लागली होती.
प्रवाशांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी चेन पुलिंग करून गाडी थांबवली. ही माहिती रेल्वे प्रशासनाला दिली. तसेच, नागरिकांनी खाली उतरू नये, असे आवाहन देखील प्रवासी करत होते. शेवटी रेल्वे प्रशासनाने ही आग विझवल्यानंतर ही गाडी रवाना झाली. याबाबत रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.