शहरं
Join us  
Trending Stories
1
वैद्यकीय हयगय, डॉक्टरांचा हलगर्जीपणा; कुठेही नमूद नाही, पोलिसांना काहीच बोध होत नाही
2
चौदा गावांचा भुर्दंड कदापि सहन करणार नाही, शिंदेंच्या निर्णयाला गणेश नाईकांचा विरोध कायम
3
IPL 2025: आईसारखी माया..!! गालावर हात फिरवून नीता अंबानींनी काढली इशान किशनची समजूत
4
मंत्री नितेश राणे यांच्या ताफ्याला दाखवले चक्क कोंबड्यांचे फोटो; सोलापूर दौऱ्यावेळी गोंधळ
5
'दामिनी' मालिकेतील अभिनेत्री आठवतेय का? म्हणते - "दामिनीचा प्रभाव आजही तसाच आहे..."
6
वक्फबाबत सुप्रीम कोर्टाचे अंतरिम आदेश; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
7
'विशाल गवळीच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करा', आई इंदिरा गवळीची याचिका दाखल करणार
8
MI Playoff Scenario: ७ सामने, ३ विजय आणि ६ गुण, प्लेऑफमध्ये जाण्यासाठी मुंबईला किती लढती जिंकाव्या लागतील? असं आहे गणित
9
‘लिव्हिंग विल’ पुनर्प्राप्तीसाठी चार महिन्यांत यंत्रणा तयार करा, उच्च  न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश
10
ठरलं! 'या' दिवशी रिलीज होणार आमिर खानचा 'सितारे जमीन पर', ट्रेलर कधी येणार?
11
Cidco Lottery 2025: अक्षय तृतीयेला सिडको आणणार १२ हजार घरे?
12
आता दुकानदारांनाही मिळणार पेन्शन? योजना या वर्ष अखेरीस सुरू होण्याची शक्यता
13
मुंबईचा फलंदाज बाद झाला, माघारी परतत असतानाच तिसऱ्या पंचांना दिसली यष्टीरक्षकाची घोडचूक, मग...
14
ठाणे: पट्टे, रॉड अन् बांबूने लहानग्यांना मारहाण, बालआश्रमातील वास्तव; ४ मुलींवर झाले अत्याचार
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२५: धन व कीर्ती यांची हानी संभवते
16
'टी. एन. शेषन यांनी मागितले होते गृहमंत्रिपद', माजी राज्यपालांच्या पुस्तकात खळबळजनक दावा
17
ठाण्यातील १,३०० झाडांवर कुऱ्हाड चालविण्याचा विकासकाचा ‘डाव’, वृक्षांचे वय लपवल्याचे वनविभागाच्या पाहणीत उघड
18
"इंडस्ट्रीतील प्रत्येक महिलेसोबत त्याचे शरीरसंबंध...", अमृता रावची बहीण प्रीतिकाचे टीव्ही अभिनेत्यावर गंभीर आरोप
19
समृद्धी महामार्गावरून मेपासून जा सुसाट; मुंबई ते नागपूर केवळ आठ तासांचा प्रवास
20
Mumbai Local: मध्य रेल्वेवर रविवारी खोळंबा, सीएसएमटी-विद्याविहारदरम्यान पाच तासांचा मेगाब्लॉक

पुणे : तरूणीला नग्न व्हिडिओ करण्यास भाग पाडले अन् तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले ; तरूणाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2021 17:51 IST

‘रॉ’ संस्थेचे बनावट ओळखपत्र तयार करून तरूणीच्या कुटुंबाला ईमेल, मेसेज आणि कॉल करून छळ

पुणे : तरूणीला नग्न व्हिडिओ करण्यास भाग पाडून तिच्याबरोबर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या आणि ‘रॉ’ संस्थेचे बनावट ओळखपत्र तयार करून उच्चपदावर काम केल्याचे भासवत तिच्या कुटुंबाला वारंवार ईमेल, मेसेज आणि कॉल करून छळवणूक करणाऱ्या आरोपीला उत्तमनगर पोलिसांनीअटक केली. न्यायाधीश जान्हवी केळकर यांनी त्याला 22 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

नितेश उर्फ निकेश प्रकाश राठोड ( वय 29 रा. मूळगाव हावनुर लमाण तांडा ता. अफजलपूर, जि.गुलबर्गा, सध्या रा: महादेवनगर हिंगणे, सिहंगड रस्ता) असे अटक केलेल्याचे नाव आहे. ही घटना 2018 ते 14 जुलै 2021 दरम्यान फिर्यादी तरूणीच्या राहात्या घरी आणि कात्रजच्या आरंभ लॉज मध्ये घडली. आरोपीने स्वत: अनाथ असल्याचे सांगून भावनिक करून घरच्यांना मारून टाकण्याची धमकी देत तिला स्वत:चे दोन नग्न व्हिडिओ करायला भाग पाडले.आरोपीने वारंवार मानसिक त्रास दिल्यामुळे तरूणीने एक्सपायर झालेल्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. नग्न व्हिडिओ सोशल मीडिया व वेबसाईटवर टाक ण्याची धमकी देत इच्छेविरूद्ध शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. आरोपीने फिर्यादीच्या परवानगीशिवाय तिचा मोबाईल अँक्सेस घेतला. अखेर तरूणीने पोलिसांकडे धाव घेतली. उत्तमनगर पोलीस ठाण्यात नितेश राठोड विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्याला अटक करून शनिवारी न्यायालयात हजर केले. आरोपीने वेगवेगळे ईमेल आयडी कुठे आणि कोणत्या नावाने तयार केले आणि कुठल्या कुठल्या गुन्हयात वापरले आहेत याबाबत तपास करणे आवश्यक आहे. आरोपीने फिर्यादीच्या मोबाईलमध्ये एक विशिष्ट प्रकारचे अ‍ॅप डाऊनलोड करून मोबाईलचा अँक्सेस स्वत: वापरला आहे. त्याने फिर्यादीच्या मोबाईलमधून काय काय फोटो आणि व मेसेज व्हिडिओ ईमेलने पाठविले आहेत याचा सखोल तपास करायचा आहे. आरोपीने या गुन्हयात वापरलेली मोडस इतर ठिकाणी वापरून इतर महिला किंवा मुलीचा वापर केला आहे का? गुन्हयामागचा उददेश काय आहे हे जाणून घ्यायचे आहे.  त्याने सीआरपीएफ तसेच 'रॉ' या महत्वपूर्ण सैन्यदलाच्या विभागात उच्चपदावर काम केल्याचे ओळखपत्र दाखविले आहे. त्या ओळखपत्राचा तपास करणे आवश्यक आहे. त्यामुळे सरकारी वकील किरण बेंडभर यांनी आरोपीला पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. ती न्यायालयाने मान्य केली.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसsexual harassmentलैंगिक छळArrestअटक