Video : कोहिनूर रेसिडेन्सीमध्ये 17व्या मजल्यावरील फ्लॅटला लागली आग;अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 12:53 IST2026-02-11T12:52:05+5:302026-02-11T12:53:01+5:30

अग्निशमन दलाच्या जवानांनी आग नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले

pune fire news Fire breaks out in 17th floor flat in Kohinoor Residency; Fire brigade reaches the spot | Video : कोहिनूर रेसिडेन्सीमध्ये 17व्या मजल्यावरील फ्लॅटला लागली आग;अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

Video : कोहिनूर रेसिडेन्सीमध्ये 17व्या मजल्यावरील फ्लॅटला लागली आग;अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

पुणे : शहरातील घोरपडी परिसरात बी. टी. कवडे रोडवरील कोहिनूर रेसिडेन्सी या उंच इमारतीत आज (दि. १ १) बुधवारी अचानक आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, इमारतीच्या 17व्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये ही आग लागली असून परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी रवाना झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून शॉर्ट सर्किटची शक्यता वर्तवली जात आहे. रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू असून कोणतीही जीवितहानी झाली आहे का याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. घोरपडी फायर ब्रिगेड कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी गर्दी झाली होती. पोलिस आणि स्थानिक प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

Web Title : पुणे: कोहिनूर रेसिडेंसी के फ्लैट में आग; दमकल मौके पर

Web Summary : पुणे के घोरपड़ी इलाके में कोहिनूर रेसिडेंसी की 17वीं मंजिल पर स्थित एक फ्लैट में आग लग गई। दमकलकर्मी आग पर काबू पाने का प्रयास कर रहे हैं। निवासियों को निकाला जा रहा है। आग लगने का कारण शॉर्ट सर्किट माना जा रहा है। अभी तक किसी के हताहत होने की खबर नहीं है।

Web Title : Pune: Fire breaks out in Kohinoor Residency flat; fire brigade on scene.

Web Summary : A fire erupted in a flat on the 17th floor of Kohinoor Residency in Pune's Ghorpadi area. Firefighters are working to control the blaze. Residents are being evacuated. The cause is suspected to be a short circuit. No casualties have been reported yet.