शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्ह्याला पाणी टंचाईच्या झळा; २७ गावं, १२९ वाड्या वस्त्यांवर टँकरद्वारे पाणी पुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 17:49 IST

निसर्ग चक्री वादळ तसेच चांगल्या पावसामुळे मागील वर्षी सर्व धरणे भरली. जलसंधारण विभागानेही पाण्याचे योग्य नियोजन केल्याने पाणी टंचाई जाणवली नाही....

पुणे : जिल्ह्यात गेल्यावर्षी चांगला पाऊस झाल्याने धरणे भरल्याने पाण्याची टंचाई जाणवली नाही. मात्र धरणातून शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी सुरु असलेल्या अवर्तनामुळे पाणलोट क्षेत्रात टंचाईसुरु झाली आहे. जिल्ह्यातील २७ गावे  आणि १२९ वाड्या वस्त्यांवर 46 टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. ३७ हजार १७२ हजार नगरिकांना याचा लाभ मिळत आहे. 

निसर्ग चक्री वादळ तसेच चांगल्या पावसामुळे मागील वर्षी सर्व धरणे भरली. जलसंधारण विभागानेही पाण्याचे योग्य नियोजन केल्याने पाणी टंचाई जाणवली नाही. मात्र एप्रिल मे महिन्यात उन्हाची दाहकता अनुभवायला येत आहे. दुर्गम तसेच अवर्षणप्रवण परिसरात जलस्रोत आटले आहेत. यामुळे त्या ठिकाणी पाणी टंचाई जाणवत आहे. धरणांतून सुरु असलेल्या अवर्तनामुळे पाण्याची पातली घटली आहे. परिणामी जिल्ह्यातील २७ गावात आणि १२९ वाड्या वस्त्यांवर ४६ टँकरच्या साहाय्याने पाणी पुरवठा केला जात आहे. 

गेल्या वर्षीच्या विचार केल्यास सध्या जिल्ह्यात सुरू असलेली टँकरची संख्या ही तुलनेने कमी आहे. जिल्ह्यातील पाणी प्रश मिटवण्यासाठी जळजीवन मिसजन अंतर्गत सर्वाधिक रकमेचा टंचाई आराखड्याला मंजुरी देण्यात आली होती. त्या अंतर्गत जिल्ह्यात पाणीटंचाई कमी करण्यासाठी तलाव खोदणे, विंधन विहिरी खोदणे गाळ उपसने, नळ पाणी पुरवठा योजना राबविणे अशी कामे हाती घेण्यात आली असून ही कामे प्रगतीपथावर आहेत.     ......... सर्वाधिक टँकर आंबेगाव तालुक्यातयंदा चांगल्या पावसामुळे पाण्याची स्थिती चांगली आहे. आंबेगाव, भोर, हवेली, खेड, जुन्नर या चार तालुक्यातील काही गावात टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. त्यात आंबेगाव तालुक्यात सर्वाधिक ११ टँकरने पाणी पुरवठा होत आहे.

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीRainपाऊस