शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

Video : दोन गट भिडले, दगड भिरकावले... ! एकवीरा देवीच्या यात्रेला गालबोट; कार्ला गडाच्या पायथ्याला हाणामारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 12:51 IST

- या गोंधळात काही हुल्लडबाजांनी डोंगरउतारावरील गवताला आग लावली.

लोणावळा : चैत्र शुद्ध सप्तमीला कार्ला गडावर आई एकवीरेचा पालखी सोहळा बुधवारी (दि. २५ मार्च) व गुरुवारी (दि. २६ मार्च) पार पडला; परंतु एकवीरा मंदिर पायथ्याला काही जणांच्या आपापसांतील भांडणाचा प्रकार घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पायथ्याला एकवीरा गडावर देवीची पालखी पुढे नेण्यावरून बुधवारी (दि. २५ मार्च) रात्री पनवेल कोळीवाडा आणि कल्याण कोळीवाड्याच्या दोन गटांमध्ये हाणामारी झाली. गुरुवारी दुपारी पुन्हा एकदा हे दोन्ही गट आमनेसामने आले. स्थानिक मंडळी देवस्थान ट्रस्ट आणि पोलिसांच्या मध्यस्थीने हा वाद थांबवला. संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले. 

पालखी सजवण्यासाठी केलेला खर्च आणि सोशल मीडियावरील वेगवेगळ्या कमेंट्स यामुळे हा वाद पेटला असल्याचे सांगण्यात येत आहे. या गोंधळात काही हुल्लडबाजांनी डोंगरउतारावरील गवताला आग लावली. तसेच दोन्ही बाजूंनी दगडफेकही झाली.यात १७ जण जखमी झाले आहेत.

'अफवांवर विश्वास ठेवू नका'

पनवेल कोळीवाडा आणि कल्याण कोळीवाडा यांच्यात आपापसात पूर्वीपासूनच वैमनस्य आहे. यापूर्वीही वेगवेगळ्या कारणांवरून या दोन्ही ठिकाणच्या लोकांची भांडणे झालेली आहेत. मिरवणूक आणि पालखीबाबत त्यांचा कुठलाही वाद नाही. त्यांचे वैयक्तिक वादातून हे भांडण झाले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

यात्रेत वाद निर्माण करणे उचित नाही. या किरकोळ वादामुळे पूर्ण यात्रेला गालबोट लागते. याचा परिणाम स्थानिकांच्या व्यवसायावरही होतो. या भांडणाशी देवस्थान अथवा देवीच्या पालखीचा कसलाही संबंध नाही. जुन्या वादातून हा प्रकार घडला आहे. यात्रा सुरळीतपणे सुरू असून, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. सर्व भाविकांना दर्शनासाठी मंदिर पूर्णवेळ खुले आहे.- दीपक हुलावळे, अध्यक्ष, एकवीरा देवस्थान ट्रस्टपोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे. दर्शन सुरळीत सुरू आहे. भाविकांनी निःसंकोच दर्शनासाठी यावे. सोशल मीडियावरील चुकीचे किंवा खोटे मेसेज, तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये. - दिनेश तायडे, पोलिस निरीक्षक, लोणावळा ग्रामीण  

English
हिंदी सारांश
Web Title : Ekvira Yatra marred by clashes; stones thrown, 17 injured.

Web Summary : Panvel and Kalyan groups clashed at Ekvira temple over procession disagreements. Stone-throwing injured 17. Police intervened, assuring smooth pilgrimage. Trust denies connection to yatra.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्रPune Crimeपुणे क्राईम बातम्या