पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...

By किरण शिंदे | Updated: June 15, 2025 12:41 IST2025-06-15T12:41:18+5:302025-06-15T12:41:49+5:30

पोलिसांनी वर जाताच घराचा दरवाजा वाजवला. मात्र दरवाजा कोणीही उडत नव्हते. काही वेळाने घरातून त्याच्या बायकोने कोण आहे म्हणून विचारले. त्यानंतर पोलिसांसोबत असलेल्या त्या महिलेने मी असल्याचे सांगत दरवाजा उघडण्यास सांगितले.

pune crime the first bullet hit Shahrukh in the thigh and he fell to the ground; such was the thrill of the encounter. | पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...

पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...

पुणे - पुण्यातील सराईत गुंड शाहरुख उर्फ अट्टि रहीम शेख याचा मध्यरात्री पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. टिपू पठाण टोळीचा सदस्य असलेला शाहरुख मोका कारवाई झाल्यानंतर फरार झाला होता. पुणेपोलिसांचे पथक त्याच्या मागावर होते. मात्र त्याचा ठाव ठिकाण लागत नव्हता.

अखेर गुन्हे शाखेच्या पोलिसांना तो लांबोटी गावात नातेवाईकाच्या घरात लपून बसला असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर गणेशाची काही पथक त्याला पकडण्यासाठी मध्यरात्री लांबोटी गावातील त्या घरात पोहोचली. मात्र पोलीस पकडण्यासाठी आल्याचे समजतात शाहरुखने शरणागती पत्करण्याऐवजी पोलिसांवरच बंदूक रोखली होती. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात शाहरुखचा मृत्यू झाला.



कसा होता गोळीबाराचा थरार?

फरार झालेला शाहरुख लांबोटी गावातील मावस भावाच्या घरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेचे पथक शनिवारी मध्यरात्री लांबोटी गावात पोहोचले. गावातील दोन मजली असलेल्या त्या घरात जाऊन पोलिसांनी शाहरुखचा फोटो दाखवत विचारले असता एका महिलेने हा व्यक्ती इथेच  टेरेसवर असलेल्या छोट्या खोलीत राहत असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी या महिलेला घेऊनच टेरेस गाठले. टेरेसवर असलेल्या छोट्या खोलीत शाहरुख त्याच्या पत्नीसोबत राहत होता.

पोलिसांनी वर जाताच घराचा दरवाजा वाजवला. मात्र दरवाजा कोणीही उडत नव्हते. काही वेळाने घरातून त्याच्या बायकोने कोण आहे म्हणून विचारले. त्यानंतर पोलिसांसोबत-असलेल्या त्या महिलेने मी असल्याचे सांगत दरवाजा उघडण्यास सांगितले. त्यानंतर शाहरुखच्या पत्नीने दरवाजा उघडला.. दरवाजा उघडताच पोलिस आत घुसले. पोलीस आल्याचे पाहताच शाहरुखने बंदूक काढून पोलिसांवर ताणली. तर छोट्या घरात शाहरुखसह दोन ते तीन लहान मुले ही होती. शाहरुखने सुरुवातीला या मुलांना ढाल बनवण्याचा प्रयत्न करत पोलिसांच्या दिशेने गोळी झाडली. त्यानंतर मात्र पोलिसांनी लहान मुलांचा बचाव करत शाहरुखच्या दिशेने गोळी झाडली. ती गोळी थेट शाहरुखच्या मांडीवर जाऊन लागली. मात्र तरीसुद्धा शाहरुखने त्याच्याजवळची बंदूक पोलिसांच्या दिशेने रोखली होती. त्यानंतर मात्र पोलिसांनी पुन्हा गोळ्या झाडल्या आणि शाहरुख आडवा पडला. तातडीने त्याला सोलापुरातील रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र रुग्णालयात नेण्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता.

दरम्यान शाहरुखला नेमक्या किती गोळ्या लागल्या याची माहिती अद्याप समोर आली नाही. पोस्टमार्टम रिपोर्टनंतर त्याचे तपशील समोर येतील. मात्र सराईत गुन्हेगाराचा एन्काऊंटरमध्ये खात्मा झाल्याने गुन्हेगारी विश्वात खळबळ उडाली आहे. शाहरुख हा पुण्यातील टिपू पठाण टोळीचा सक्रिय सदस्य होता. टिपू पठाण टोळीवर पुणे पोलिसांनी मोक्का कायद्यानुसार कारवाई केली आहे. या टोळीवर खंडणी, बेकायदेशीर धंदे, दहशत निर्माण करणे, वसुली करणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर शाहरुख याच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. मोका कारवाई झाल्यानंतर तो फरार होता.

Web Title: pune crime the first bullet hit Shahrukh in the thigh and he fell to the ground; such was the thrill of the encounter.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.