Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 21:31 IST2026-04-09T21:29:09+5:302026-04-09T21:31:11+5:30

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात महिलेने प्रियकराच्या मदतीने स्वतःच्या ६ वर्षाच्या मुलाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली.

Pune Crime: She forgot everything in love and murdered a six-year-old boy with the help of her lover, because...; Incident in Pune district | Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना

Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना

चाकण : आई व तिच्या प्रियकराने प्रेमात अडथळा ठरत असणाऱ्या स्वतःच्याच सहा वर्षांच्या चिमुकल्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आई आणि तिच्या प्रियकराने मिळून या निष्पाप मुलाचा जीव घेतल्याच्या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली. खेड तालुक्यातील कुरुळी येथे शनिवारी (४ एप्रिल) रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.

आवेज मेहबुब शेख (वय ६) असे हत्या झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्याची आई बसरीन मेहबुब शेख (वय २७) ही अटक करण्यात आली आहे तर फरारी झालेला तिचा प्रियकर राम विनायक कजेवाड याच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत. याप्रकरणी इसाक महमद शेख (वय ४९, रा. पुस, ता. अंबाजोगाई, जि. बीड) यांनी दक्षिण महाळुंगे पोलिसांत फिर्याद दिली आहे.

सहा वर्षाच्या मुलाची हत्या कशी केली?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इसाक शेख यांचा नातू आवेज हा आपल्या आईसोबत कुरुळी (ता. खेड) येथे भाड्याच्या खोलीत राहत होता. त्याची आई आणि प्रियकराच्या प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून त्यांनी संगनमत करून आवेज या चिमुकल्याला बाथरूममध्ये नेले. त्यानंतर पाण्याच्या बादलीत डोके बुडवून दाबून धरले, तसेच भिंतीवर, जमिनीवर डोके आपटून त्याची हत्या केली.

आजोबाला शंका आली आणि बिंग फुटले

हत्या केल्यानंतर आरोपींनी मृतदेह इर्टिका कारमधून धर्मापुरी (ता.परळी, जि.बीड) येथे नेला. तेथे मुलाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा बनाव करण्यात आला. मात्र संशय आल्याने इसाक शेख यांनी परळी ग्रामीण पोलिसांना माहिती दिली.

त्यानुसार पोलिसांनी आई बसरीन शेख हिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. गुन्हा दक्षिण महाळुंगे पोलिसांकडे वर्ग करण्यात आल्यावर या प्रकरणात आईला अटक करण्यात आली असून, फरार प्रियकर राम कजेवाड याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. 

Web Title : पुणे: माँ, प्रेमी ने छह साल के बेटे को मार डाला; प्रेम संबंध कारण

Web Summary : पुणे में, एक माँ और उसके प्रेमी ने अपने छह साल के बेटे की बेरहमी से हत्या कर दी, जो उनके रिश्ते में बाधा बन रहा था। बच्चे को डुबो दिया गया और उसका सिर दीवार से टकराया गया। माँ गिरफ्तार; प्रेमी फरार है।

Web Title : Pune: Mother, Lover Kill Six-Year-Old Son; Love Affair Motive

Web Summary : In Pune, a mother and her lover brutally murdered her six-year-old son, who was an obstacle to their relationship. The child was drowned and his head was hit against the wall. The mother is arrested; the lover is absconding.