गावात दहशत माजवल्या प्रकरणी ओतूर पोलिसांकडून सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 10:28 IST2025-03-25T10:27:57+5:302025-03-25T10:28:20+5:30
बेकायदेशीर जमाव जमवून, शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली

गावात दहशत माजवल्या प्रकरणी ओतूर पोलिसांकडून सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ओतूर - जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार गावात बेकायदेशीर जमाव जमवून दहशत माजवली प्रकरणी ओतूर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांनी ही माहिती दिली.
महिनाभर गुंगारा देणारा शिवद्रोही प्रशांत कोरटकर जाळ्यात कसा अडकला?
मिळालेल्या माहितीनुसार, दि. १५ मार्च रोजी सकाळी ९.३० च्या सुमारास गावातील बस स्टँड जवळ फिर्यादी निखिल सुभाष यादव आणि त्यांचे सहकारी राहुल जाधव व दत्तात्रय चव्हाण यांना आरोपींनी मारहाण करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, गावात बदनामी केल्याच्या कारणावरून अमोल वंडेकर आणि त्यांच्या साथीदारांनी हातात काटे घेत, बेकायदेशीर जमाव जमवून, शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच गावात दहशतीचे वातावरण निर्माण केले.
दरम्यान,अमोल नामदेव वंडेकर, आनंद नामदेव वंडेकर, किसन नानाभाऊ कटे, तोशिफ भाईमिया शेख आणि तीन ते चार अनोळखी इसम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांनी ही माहिती दिली. या प्रकरणी दि. १९ मार्च रोजी निखिल यादव यांनी ओतूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपींवर संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार भरत सूर्यवंशी करत आहेत.