शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
2
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
3
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
4
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
5
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
6
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
7
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
8
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
9
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
10
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
11
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
12
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
13
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
14
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
17
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
18
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
19
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime: बुधवार पेठेतील डिस्को-मॅचबॉक्स बिल्डिंगवर छापे; १५ बांगलादेशींसह १८ जण ताब्यात

By किरण शिंदे | Updated: April 28, 2026 11:13 IST

Crime News - ताब्यात घेतलेल्या काही महिला देहविक्री व्यवसायात गुंतलेल्या होत्या. यामध्ये बांगलादेशातून बेकायदेशीररित्या भारतात आलेल्या महिलांचाही समावेश आहे. 

पुणे - शहरातील बुधवार पेठ परिसरात सुरू असलेल्या अवैध देहविक्री व्यवसायावर पोलिसांनी मोठी कारवाई करत संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. डिस्को आणि मॅचबॉक्स (माचीस) बिल्डिंगमध्ये टाकलेल्या छाप्यात एकूण १८ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, यात १५ बांगलादेशी नागरिकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या कारवाईदरम्यान एका अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार पेठेतील काही इमारतींमध्ये गुप्तपणे देहविक्री व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार विशेष पथक तयार करून डिस्को आणि मॅचबॉक्स बिल्डिंगमध्ये एकाच वेळी छापा टाकण्यात आला. या धाडीत अनेक महिला आणि काही पुरुष संशयास्पद अवस्थेत आढळून आले.

चौकशीत समोर आले की, ताब्यात घेतलेल्या काही महिला देहविक्री व्यवसायात गुंतलेल्या होत्या. यामध्ये बांगलादेशातून बेकायदेशीररित्या भारतात आलेल्या महिलांचाही समावेश आहे. 

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांमध्ये १५ बांगलादेशी असून, त्यात ११ महिला, ३ पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे, ताब्यात घेतलेल्यामध्ये १५ वर्षे ४ महिन्यांची एक अल्पवयीन मुलगी आढळून आली. प्राथमिक तपासात तिला जबरदस्तीने देहविक्री व्यवसायात ढकलण्यात आल्याचे स्पष्ट झाले असून, तिची सुटका करण्यात आली आहे. 

या रॅकेटचा मुख्य सूत्रधार म्हणून सुमित मिलिंद चव्हाण याचे नाव समोर आले आहे. तो दोन वेगवेगळ्या इमारतींमधून हा व्यवसाय चालवत असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. तसेच ज्योती उर्फ सबीना शेख ही ‘अक्का’ म्हणून संपूर्ण व्यवहार सांभाळत होती. राहुल शर्मा आणि समीर हलवदार हे दोघे मॅनेजर म्हणून काम करत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

कारवाईदरम्यान पोलिसांनी संबंधितांकडून मोबाईल फोन आणि हिशोबाच्या डायऱ्या जप्त केल्या असून, या माध्यमातून आर्थिक व्यवहार आणि ग्राहकांबाबत अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे. पोलिसांनी या प्रकरणी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune: Brothel Raid Uncovers Trafficking Ring; Bangladeshis, Minor Rescued

Web Summary : Pune police raided a brothel in Budhwar Peth, arresting 18, including 15 Bangladeshis. A minor was rescued from forced prostitution. The racket, run by Sumit Chavan, involved trafficking women and was managed by Jyoti Sheikh. Police seized phones and ledgers, filing charges under anti-trafficking laws.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPune Crimeपुणे क्राईम बातम्याMaharashtraमहाराष्ट्र