Pune Crime: ऑफिसला जाण्यासाठी घरातून बाहेर पडले, परेश यांचा लोणावळ्यातील ७०० फूट खोल दरीत सापडला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 15:53 IST2026-01-04T15:51:51+5:302026-01-04T15:53:20+5:30
Pune Crime: पुण्यातून बेपत्ता झालेल्या व्यक्तीचा लोणावळ्यामधील एका खोल दरीत मृतदेह सापडला आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

Pune Crime: ऑफिसला जाण्यासाठी घरातून बाहेर पडले, परेश यांचा लोणावळ्यातील ७०० फूट खोल दरीत सापडला मृतदेह
परेश हे नेहमीप्रमाणे घरातून ऑफिससाठी बाहेर पडले. ते परत आलेच नाही. त्यानंतर ते बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली गेली. त्यानंतर शोधाशोध सुरू झाला. परेश यांची जेव्हा बातमी कळली, तेव्हा संपूर्ण कुटुंब हादरले. पुण्यातून बेपत्ता झालेल्या परेश यांचा मृतदेहच लोणावळ्यातील एका खोल दरीत सापडला. तिथेच लायन्स पॉईंटजवळ त्यांची कार उभी असलेली दिसली आणि त्यानंतर हे समोर आले.
परेश सूर्यकांत हटकर (वय ३८, रा. सकाळनगर, बाणेर रोड, पुणे) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. ते बँक ऑफ इंडियामध्ये वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. परेश शुक्रवारपासून बेपत्ता होते. लोणावळ्यातील लायन्स पाईंट येथे असलेल्या सातशे खोल दरीत त्यांचा मृतदेह मिळाला.
ऑफिससाठी बाहेर पडले...
२ जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता परेश हटकर हे ऑफिसला जाण्यासाठी घरातून बाहेर पडले. शुक्रवारी रात्री ते घरीच आले नाही. कुटुंबीयांनी शनिवारी (३ जानेवारी) चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.
तक्रार मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला. परेश हटकर यांची कार लोणावळ्यातील लायन्स पाईंट येथील पार्किंगमध्ये आढळून आली. त्यांचे मोबाईल लोकेशन त्याच परिसरात आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी त्याच परिसरात त्यांचा शोध सुरू केला.
७०० खोल दरीतून बाहेर काढला मृतदेह
शिवदुर्ग रेस्क्यू टीमची मदत घेण्यात आली. शनिवारी दुपारी टीमने दरीत उतरून शोध सुरू केला. दुपारी ७०० फूट खोल दरीतून त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यांचा मृत्यू कसा झाला, त्यांच्यासोबत काय झाले? असे प्रश्न त्यांच्याबद्दल उपस्थित होत असून, सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.