विद्युत मोटारीचे केबल चोरी करणाऱ्या ६ आरोपींला ओतुर पोलीसांनी केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 10:22 IST2025-03-14T10:21:50+5:302025-03-14T10:22:20+5:30

- तब्बल १ लाख १४ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

pune crime Otur police arrest 6 accused for stealing electric car cables | विद्युत मोटारीचे केबल चोरी करणाऱ्या ६ आरोपींला ओतुर पोलीसांनी केली अटक

विद्युत मोटारीचे केबल चोरी करणाऱ्या ६ आरोपींला ओतुर पोलीसांनी केली अटक

पुणे - ओतूर पोलिसांनी जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विहिरींमधील विद्युत मोटारीचे केबल चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगार टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात सहा आरोपींना अटक करण्यात आली असून तब्बल १ लाख १४ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ओतूर, रोहोकडी आणि खामुंडी परिसरात शेतकऱ्यांच्या विहिरींमधून विद्युत मोटारीच्या केबल चोरीच्या घटना घडत होत्या. गुन्ह्यांचा तपास करत असताना पोलिसांना एका अटक आरोपीकडून महत्त्वाची माहिती मिळाली. तांत्रिक तपासाच्या मदतीने पोलिसांनी चौकशी केल्यानंतर आरोपींनी विविध भागात केबल चोरी केल्याची कबुली दिली.  
   
दरम्यान, केशव बबन काळे (रा. कुरकुंडी, ता. संगमनेर)  , किशोर सुरेश काळे (रा. भोजदरी, ता. संगमनेर) , राहुल विठ्ठल काळे (रा. भोजदरी, ता. संगमनेर) , दिपक तात्याबा डोके (रा. सावरचोळ, ता. संगमनेर)   हे सर्व आरोपी एकत्र येऊन केबल चोरी करत होते. त्यानंतर चोरी केलेल्या केबल्स जाळून त्यातील धातू सोबरन राजाराम चौहान (रा. घारगाव, ता. संगमनेर, मूळ रा. मध्यप्रदेश) आणि विक्रमसिंग अमरसिंग राठोड (रा. आळेफाटा, मूळ रा. राजस्थान) या भंगार व्यापाऱ्यांना विकले जात होते.  

केशव काळे आणि किशोर काळे हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वीही पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी  रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलिसांनी ही कारवाई केली. तपास पोलीस हवालदार बाळशीराम भवारी  आणि नदीम तडवी करत आहेत.  

सर्व आरोपींना जुन्नर न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून ते सध्या पोलीस कोठडीत आहेत. या कारवाईमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ओतूर पोलिसांनी घेतलेली जलद कारवाई आणि गुन्हेगारांना अटक केल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Web Title: pune crime Otur police arrest 6 accused for stealing electric car cables

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.