मकरसंक्रातीचा वाण खरेदी, महिलेने भाव केला अन् दुकानदाराचे नको ते वर्तन..! पुण्यात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 18:53 IST2026-01-02T18:52:43+5:302026-01-02T18:53:46+5:30
एका प्लास्टिक साहित्य विक्री करणाऱ्या विक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

मकरसंक्रातीचा वाण खरेदी, महिलेने भाव केला अन् दुकानदाराचे नको ते वर्तन..! पुण्यात गुन्हा दाखल
पुणे :मकर संक्रांतीनिमित्त वाण साहित्य खरेदीसाठी गेलेल्या महिलेचा विनयभंग करण्यात आल्याची घटना शुक्रवार पेठेत घडली. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी एका विक्रेत्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका ३१ वर्षीय महिलेने फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, एका प्लास्टिक साहित्य विक्री करणाऱ्या विक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मकर संक्रांतीनिमित्त तक्रारदार महिला बुधवारी (दि. ३१) शुक्रवार पेठेतील भुतकर हौद परिसरात खरेदीसाठी गेल्या होत्या. तेथील एका प्लास्टिक साहित्य विक्री करणाऱ्या दुकानात त्यांनी मसाल्याचे डबे पाहिले. त्यांनी प्लास्टिक डब्याची किंमत विचारली. डब्याची किंमत कमी करा, असे त्यांनी विक्रेत्याला सांगितले.
तेव्हा विक्रेत्याने महिलेशी अश्लील भाषेत संवाद साधला. त्यानंतर महिलेने जवळच असलेल्या शुक्रवार पेठ पोलिस चौकीत तक्रार दिली. याप्रकरणी विक्रेत्याविरोधात विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस हवालदार येसादे पुढील तपास करत आहेत.