शिरूर पोलिसांचा गावठी दारू हातभट्ट्यांवर छापा, सव्वा लाखाची दारू, रसायन जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 12:07 IST2025-10-10T12:06:20+5:302025-10-10T12:07:16+5:30
कवठे यमाई, पिंपरखेड, जांबुत, आमदाबाद या गावांच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात गावठी दारूच्या भट्ट्या असून मोठ्या प्रमाणात दारूनिर्मिती करून विक्री केली जात आहे.

शिरूर पोलिसांचा गावठी दारू हातभट्ट्यांवर छापा, सव्वा लाखाची दारू, रसायन जप्त
शिरूर/कवठे यमाई : शिरूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विविध ४ ठिकाणी छापे टाकून सव्वा लाखाची गावठी दारू व रसायन जप्त करण्याची मोठी कारवाई केली. या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सागर गणपत गडगुळ (रा. कवठेयमाई ता. शिरूर जि.पुणे), संदीप निवृत्ती मुंजाळ (रा. कवठेयमाई, ता. शिरूर, जि.पुणे), भाऊसाहेब सावळेराम भोर (रा. पिंपरखेड, ता. शिरूर, जि.पुणे), प्रवीण कैलास सोनवणे (रा. जांबुत, ता. शिरूर, जि. पुणे), आंबादास सीताराम तिळघाम (रा. अकोला, ता. उमरेड, जि. नागपूर) अशी या प्रकरणी गुन्हे दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या तालुक्यातील, तालुक्यातील कवठे यमाई, पिंपरखेड, जांबुत, आमदाबाद या गावांच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात गावठी दारूच्या भट्ट्या असून मोठ्या प्रमाणात दारूनिर्मिती करून विक्री केली जात आहे. या माहितीवरून पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी पथक तयार करून स्वत: नेतृत्व करत या चारही गावात नियोजनबद्ध् छापे टाकले. अचानकपणे गावठी हातभट्टी निर्मिती व देशी विदेशी दारूवर यशस्वीपणे एकुण ४ छापे टाकून कारवाई करण्यात आली. यामध्ये रसायनाचे २० प्लॅस्टिक पिंप जाळून नष्ट करण्यात आले. एकूण १ लाख २३ हजार् ७१५ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले, पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार सुद्रिक, पोलिस हवालदार कळमकर व पोलीस हवालदार भवर यांनी केली आहे. गावठी हातभट्टी निर्मिती व विक्री तसेच विना परवाना देशी विदेशी दारूचा साठा व विक्री यांसारख्या अवैध कृत्यांमध्ये सहभागी असणाऱ्यांनी त्वरित हे बेकायदेशीर उद्योग बंद करून कायद्याचा आदर करावा. अन्यथा, पोलिस प्रशासनाडून अधिक कठोर पावले उचलण्यात येतील असा इशारा पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिला आहे.