शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
2
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
3
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
4
चाणक्य नीती: ऑफिस असो वा घर, प्रगतीसाठी नेहमी लक्षात ठेवा आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले 'हे' १० नियम!
5
महाग सोन्यामुळे भारताची तिजोरी का रिकामी होत चालली आहे?
6
"ट्रम्प ब्रँड विषारी झालाय" म्हणत ट्रम्प टॉवरचा प्रकल्पच गुंडाळला; ऑस्ट्रेलियात बिल्डरकडून 'करेक्ट कार्यक्रम'
7
अजब-गजब सवय... गेली ८ वर्ष एकच अंडरवेयर घालून खेळतोय ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू एडरसन
8
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
9
फ्री वायफायच्या नादात चुकूनही करू नका 'हे' काम; अन्यथा एका मिनिटात बँक बॅलन्स होईल झिरो!
10
तमिळनाडू सरकारचा २४ तासात मोठा 'यू-टर्न'; ज्योतिषी रिकी पंडित यांची 'OSD' पदावरून उचलबांगडी
11
Palmistry: सरकारी नोकरी, खाजगी नोकरी की व्यवसाय? तुमच्या हातावरील रेषा काय सांगतात? 
12
Video - १ कोटीची नोकरी सोडून अपार्टमेंट्समध्ये करते साफसफाई; म्हणाली, "पैसा म्हणजे स्वातंत्र्य"
13
Tata Altroz CNG AMT: ट्रॅफिकच्या कटकटीतून सुटका, टाटा अल्ट्रोझ सीएनजी ऑटोमॅटिक भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत!
14
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
15
Tata Trusts Row: ३६ वर्षांपूर्वीच्या शेअर ट्रान्सफरवरुन नवा वाद; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांना नोटीस
16
पॅट कमिन्सला BCCIचा मोठा दणका! हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यरसह 'नकोशा' यादीत मिळालं स्थान
17
Loan Rates Hike: 'या' सरकारी बँकेनं वाढवले व्याजदर, आता Home Loan आणि Car Loan चे EMI होऊ शकतात महाग
18
तामिळनाडूत मोठ्ठा 'खेला', ११८ साठी झगडणाऱ्या विजय यांना बहुमत चाचणीत १४४ आमदारांचा पाठिंबा! काय घडलं?
19
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
Daily Top 2Weekly Top 5

स्वारगेट परिसरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट; स्थानिक पोलिसांचे दुर्लक्ष ?

By किरण शिंदे | Updated: May 13, 2026 12:02 IST

Pune crime - गुन्हे शाखा आणि अमली पदार्थ विरोधी पथकाला कारवाई करावी लागत असताना स्थानिक पोलीस नेमके काय करत होते, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

पुणे -  शहरात अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाहीत, असा स्पष्ट इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला होता. मात्र, त्यानंतरही स्वारगेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंदे खुलेआम सुरू असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, गुन्हे शाखा आणि अमली पदार्थ विरोधी पथकाला कारवाई करावी लागत असताना स्थानिक पोलीस नेमके काय करत होते, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

स्वारगेट परिसरात जुगार अड्डे, बेकायदेशीर मद्यविक्री आणि इतर अवैध धंद्यांवर सलग कारवाया झाल्याने या भागात अवैध व्यवसायांचे जाळे किती मोठ्या प्रमाणावर पसरले आहे, हे पुन्हा एकदा उघड झाले आहे. त्यामुळे या धंद्यांना स्थानिक पोलिसांचे संरक्षण आहे का, अशी चर्चा देखील आता रंगू लागली आहे.

कॅनॉल रोडवरील जुगार अड्ड्यावर कारवाई
स्वारगेट बस स्थानकाजवळील कॅनॉल रोड परिसरात सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईदरम्यान पोलिसांनी रोख रक्कम तसेच जुगारासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केले. या प्रकरणी नदीम अतुल शेख आणि बाळासाहेब दगडू अवघडे या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार विनोद चव्हाण यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.

सार्वजनिक शौचालयातून सुरू होती बेकायदेशीर मद्यविक्री

स्वारगेट परिसरातील एसटी अधिकारी वसाहतीमधील सार्वजनिक शौचालयात बेकायदेशीरपणे मद्यविक्री सुरू असल्याची धक्कादायक बाबही समोर आली आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत रजत दीपक गायकवाड याला अटक केली. त्याच्या ताब्यातून तब्बल 47 हजार रुपये किमतीचे देशी आणि विदेशी बनावटीचे मद्य जप्त करण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे अवैध मद्यविक्री सुरू असल्यामुळे परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

मार्केटयार्ड ट्रक पार्किंगमध्येही जुगार अड्डा

स्वारगेट पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मार्केटयार्ड ट्रक पार्किंग परिसरात सुरू असलेल्या आणखी एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई केली. या ठिकाणी ‘कल्याण’ नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. कारवाईदरम्यान रहीम अब्दुल रजाक शेख याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त केले.

स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

एकाच परिसरात सलगपणे जुगार अड्डे आणि बेकायदेशीर मद्यविक्रीवर कारवाया होत असताना स्थानिक पोलीस प्रशासनाला याची माहिती नव्हती का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. गुन्हे शाखा आणि विशेष पथकांना कारवाई करावी लागत असेल, तर स्थानिक पोलिसांनी या अवैध धंद्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले का, अशीही चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, या प्रकरणांमुळे स्वारगेट परिसरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून वरिष्ठ पोलीस अधिकारी याबाबत काय भूमिका घेतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Illegal Businesses Flourish in Swargate; Local Police Neglecting?

Web Summary : Despite warnings, Swargate faces illegal businesses like gambling and liquor sales. Crime branch actions raise questions about local police negligence. Citizens express anger.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPune Crimeपुणे क्राईम बातम्याCrime Newsगुन्हेगारी