Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 18:11 IST2025-11-26T18:08:36+5:302025-11-26T18:11:46+5:30
Pune Crime news: कोल्हापूर जिल्ह्यातील एका व्यक्तीने पुण्यातील एका महिलेविरोधात तक्रार दिली. त्याने महिलेवर गंभीर आरोप केले. महिला व्यक्तीला प्रयागराजला जायचे म्हणून कोथरुडमधील घरी घेऊन गेली आणि....

Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
"पुण्यातील महिला सविता (नाव बदलेले) आम्हाला तुळजापूरला भेटली होती. मी कुटुंब आणि मित्रांसह दर्शनासाठी गेलो होतो, तेव्हा आमची ओळख झाली होती. त्यानंतर सविताने माझ्या पत्नीला कॉलवरून बोलणं सुरू केलं. आमच्या घरी येऊन राहिली. माझ्या पत्नीला म्हणाली की मला भाऊ मानणार. पण, त्यानंतर तिने जवळीक करण्यास सुरूवात केली", असे सांगत कोल्हापूर जिल्ह्यातील एका व्यक्तीने पुण्यात राहणाऱ्या आरोपी महिलेवर गंभीर आरोप केले आहेत.
चंदगड तालुक्यातील ४७ वर्षीय व्यक्तीने पुण्यातील कोथरूडमध्ये राहणाऱ्या एका महिलेविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर हे प्रकरण समोर आले.
लॉजमधील खोलीत गेली आणि मला बोलावून घेतलं
तक्रारदार व्यक्तीने म्हटले आहे की, "महिला माझ्या घरी येऊन राहिली. माझ्या पत्नीसमोर मला भाऊ म्हणाली, पण नंतर तिने जवळीक करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तिला निघून जाण्यास आणि परत न येण्यास सांगितले. त्यानंतर तिने माझी माफी मागितली. मी तिला चंदगड स्थानकात सोडायला जात होतो. त्यावेळी ती म्हणाली की, मला वॉशरुमला जायचे आहे आणि मी उघड्यावर जात नाही."
"मी तिला एका लॉजमध्ये जाण्यास सांगितले. ती लॉजमधील रुममध्ये गेली. नंतर मला बोलावलं. मला म्हणाली मी उच्च न्यायालयात वकील आहे. मी तुमची साथ देईन, तुमच्या मुलाला मंत्रालयातील लोकांच्या ओळखीने नोकरीला लावेन, असे म्हणत माझा हात धरला आणि जवळ ओढू लागली. मी तिला नकार दिला आणि खाली येऊन थांबलो. त्यानंतर ती पुण्याला गेली", असे तक्रारीत म्हटले आहे.
कुंभमेळ्याला जायचं म्हणून पुण्यातील घरी घेऊन गेली
तक्रारीत या व्यक्तीने म्हटले आहे की, "फेब्रुवारीमध्ये तीन दिवस ती माझ्या घरी येऊन थांबली. पुण्याला गेल्यानंतर तिने माझ्या पत्नीला कॉल केला आणि म्हणाली की 'माझी मैत्रीण आणि तिची फॅमिली काशी विश्वनाथाच्या दर्शनासाठी जात आहे. मी तुमच्या पतीला भाऊ म्हणून सोबत घेऊन जाणार आहे. कुंभमेळा भरला आहे. त्याला माझ्यासोबत पाठवा.' माझ्या पत्नीने याला होकार दिला."
"२५ फेब्रुवारी रोजी मी पुण्यात आलो. त्यानंतर ती मला स्वारगेट स्थानकात भेटली. मला एक मोबाईल दिला. मला तिच्या कोथरूडमधील घरी घेऊन गेली. मला सांगितलं की, मैत्रिणीचा प्लॅन रद्द झाला आहे. आपण दोघेच विमानाने जाऊ. त्यानंतर तिच्या बेडरुममध्ये मला झोपवले. मला तिने काहीतरी प्यायला दिले आणि माझ्यासोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मी रागाच्या भरात तिथून निघून जात होतो. तितक्या माझा हात धरला आणि म्हणाली की, तू इथून गेला, तर तुला इथेच काहीतरी करेन. मी सांगेन तसंच राहायचं अशी धमकी दिली", असेही तक्रारीत म्हटले आहे.
काशीला नेले आणि....
तक्रारदाराने म्हटले आहे की, "सविताने मला मुंबई विमानतळावरून काशीला नेले. मला म्हणाली की, तू आता माझ्या कब्जात आहेस, काही कूरकूर केली तर तुझ्या घरी जाऊ देणार नाही. तुझे कुटुंब उद्ध्वस्त करेन. मी देवदर्शनासाठी होकार दिला. ती मला एका पंडिताकडे घेऊन गेली. त्याने मला शनि असल्याचे सांगितले. त्यानंतर मला बळजबरी तीन दिवस तिथे ठेवून घेतले. शरीरसंबंध ठेव म्हणाली. माझ्याशी जवळीक करत होती पण माझ्या पत्नीचा कॉल आला. "
"त्यानंतर मी गावी आलो. मी माझ्या पत्नीला झालेला प्रकार सांगितला. पत्नीला सांगितलं म्हणून सविता माझ्यावर चिडली. तिने माझ्या पत्नीने तिला कॉल करून झापलं. काही दिवस सविताने कॉल केला नाही. काही दिवसांनी दुसऱ्या नंबरवरून कॉल केला आणि २ लाख रुपये दे नाहीतर, तुझे फोटो व्हायरल करेन. बदनामी करेन अशा धमक्या देऊ लागली. त्यानंतर मी या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली", असे या व्यक्तीने म्हटले आहे. याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी महिलेविरोधात धमकी देऊन वसुली करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.