पुणे : पादचारी तरुणाला धमकावून त्याच्याकडील १२ हजारांची रोकड लुटल्याची घटना सहकारनगरमधील तुळशीबागवाले काॅलनीत घडली. या प्रकरणी चार चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सनैवर मोजा अन्सारी (वय ३३, सध्या रा. तुळशीबागवाले काॅलनी, सहकारनगर, मूळ रा. उत्तर प्रदेश) याने पर्वती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्सारी मूळचा उत्तर प्रदेशातील आहे. तो मजुरी करतो. अन्सारी हा तुळशीबागवाले काॅलनी परिसरातून महिनाभरापूर्वी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास निघाला होता. त्याला मासिक वेतन मिळाले होते. १२ हजारांची रोकड त्याने खिशात ठेवली होती. चौघांनी त्याला अडवले आणि तुझा मोबाइल फुटला आहे, असे सांगून धमकवण्यास सुरुवात केली.
अन्सारीला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्याच्या खिशातील १२ हजारांची रोकड लुटून चोरटे पसार झाले. सुरुवातीला घाबरलेल्या अन्सारीने पोलिसांकडे तक्रार दिली नव्हती. त्याने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर या प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. पोलिस उपनिरीक्षक पवार पुढील तपास करत आहेत.
Web Summary : In Sahakarnagar, Pune, a gang threatened and robbed a young laborer of ₹12,000. Police have registered a case and are investigating the robbery.
Web Summary : पुणे के सहकारनगर में एक गिरोह ने एक युवक को धमकाया और उससे 12,000 रुपये लूट लिए। पुलिस ने मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है।