शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime: भोंदू ऋषिकेश वैद्यचे आणखी साथीदार आहेत का? कोर्टात घुमला सवाल; प्रकरणाला नवं वळण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 11:55 IST

भोंदू ऋषिकेश वैद्य भोंदूने तिला जाळ्यात ओढले. 'माझ्यात दैवी संचार आहे. ईश्वराची उपासना कशी करायची, याचे तंत्र तुला शिकवितो,' अशी बतावणी त्याने महिलेकडे केली.

पुणे : दैवी शक्तीचा संचार असल्याची बतावणी करून महिलेवर अत्याचार करून पसार झालेला भोंदू ऋषीकेश वैद्य याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पिंपरीतून शुक्रवारी रात्री उशिरा ताब्यात घेत अटक केली. याबाबत एका ३५ वर्षीय महिलेने फिर्याद दिली होती. पीडित महिला मूळची पुण्यातील आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये महिलेची भोंदू ऋषीकेश वैद्य याच्याशी सोशल मीडियाद्वारे ओळख झाली. आरोपी मूळचा वसईचा आहे.

पीडित महिला व्रतवैकल्ये करायची. भोंदू ऋषिकेश वैद्य भोंदूने तिला जाळ्यात ओढले. 'माझ्यात दैवी संचार आहे. ईश्वराची उपासना कशी करायची, याचे तंत्र तुला शिकवितो,' अशी बतावणी त्याने महिलेकडे केली.

त्यानंतर त्याने महिलेला जाळ्यात ओढले. आरोपी २०२३ मध्ये पुण्यात आला. त्याने पीडित महिलेची मांजरी परिसरात भेट घेतली. त्यानंतर गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. आरोपीने तिला पुन्हा वसईत बोलावले. वसईतही तिच्यावर बलात्कार केला.भोंदू अशोक खरात याने महिलांना जाळ्यात ओढून बलात्कार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पुण्यातील पीडित महिलेने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. तिच्यावर गुदरलेल्या प्रसंगाची माहिती तिने पोलिसांनी दिली. सुरुवातीला तिने वसईतील माणिकपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

चार पथकांकडून शोधवसई पोलिसांनी गुन्हा तपासासाठी हडपसर भागात मांजरी पोलिस ठाण्यात वर्ग केला. वैद्य याचा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिसांच्या चार पथकांकडून शोध घेण्यात येत होता. वैद्य हा पिंपरीत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने त्याला अटक केली, असे गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी दिली.  

वैद्यला पोलिस कोठडीबलात्कार प्रकरणातील भोंदू ऋषिकेश वैद्य याला शनिवारी वानवडी येथील न्यायालयात हजर करण्यात आले. लष्कर न्यायालयातील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी बी. एस. जगदाळे यांनी त्याला दि. ६ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. आरोपीच्या लैंगिक क्षमतेची चाचणी करावयाची आहे. त्याने गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करावयाचे आहे. त्याने समाज माध्यमांत छायाचित्र प्रसारित केली का? तसेच त्याचे आणखी कोणी साथीदार आहेत का? यादृष्टीने तपास करावयाचा असल्याने पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील कविता कांबळे यांनी केली.  

English
हिंदी सारांश
Web Title : Fake godman arrested for rape; court probes accomplices.

Web Summary : Rishikesh Vaidya, a fake godman, was arrested for raping a woman he met online. The court is investigating potential accomplices and his motives. The police are seeking to analyze his social media accounts.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPune Crimeपुणे क्राईम बातम्या