Pune Crime: भोंदू ऋषिकेश वैद्यचे आणखी साथीदार आहेत का? कोर्टात घुमला सवाल; प्रकरणाला नवं वळण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 11:55 IST2026-03-29T11:54:57+5:302026-03-29T11:55:25+5:30
भोंदू ऋषिकेश वैद्य भोंदूने तिला जाळ्यात ओढले. 'माझ्यात दैवी संचार आहे. ईश्वराची उपासना कशी करायची, याचे तंत्र तुला शिकवितो,' अशी बतावणी त्याने महिलेकडे केली.

Pune Crime: भोंदू ऋषिकेश वैद्यचे आणखी साथीदार आहेत का? कोर्टात घुमला सवाल; प्रकरणाला नवं वळण
पुणे : दैवी शक्तीचा संचार असल्याची बतावणी करून महिलेवर अत्याचार करून पसार झालेला भोंदू ऋषीकेश वैद्य याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पिंपरीतून शुक्रवारी रात्री उशिरा ताब्यात घेत अटक केली. याबाबत एका ३५ वर्षीय महिलेने फिर्याद दिली होती. पीडित महिला मूळची पुण्यातील आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये महिलेची भोंदू ऋषीकेश वैद्य याच्याशी सोशल मीडियाद्वारे ओळख झाली. आरोपी मूळचा वसईचा आहे.
पीडित महिला व्रतवैकल्ये करायची. भोंदू ऋषिकेश वैद्य भोंदूने तिला जाळ्यात ओढले. 'माझ्यात दैवी संचार आहे. ईश्वराची उपासना कशी करायची, याचे तंत्र तुला शिकवितो,' अशी बतावणी त्याने महिलेकडे केली.
त्यानंतर त्याने महिलेला जाळ्यात ओढले. आरोपी २०२३ मध्ये पुण्यात आला. त्याने पीडित महिलेची मांजरी परिसरात भेट घेतली. त्यानंतर गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. आरोपीने तिला पुन्हा वसईत बोलावले. वसईतही तिच्यावर बलात्कार केला.
भोंदू अशोक खरात याने महिलांना जाळ्यात ओढून बलात्कार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पुण्यातील पीडित महिलेने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. तिच्यावर गुदरलेल्या प्रसंगाची माहिती तिने पोलिसांनी दिली. सुरुवातीला तिने वसईतील माणिकपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
चार पथकांकडून शोध
वसई पोलिसांनी गुन्हा तपासासाठी हडपसर भागात मांजरी पोलिस ठाण्यात वर्ग केला. वैद्य याचा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिसांच्या चार पथकांकडून शोध घेण्यात येत होता. वैद्य हा पिंपरीत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने त्याला अटक केली, असे गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी दिली.
वैद्यला पोलिस कोठडी
बलात्कार प्रकरणातील भोंदू ऋषिकेश वैद्य याला शनिवारी वानवडी येथील न्यायालयात हजर करण्यात आले. लष्कर न्यायालयातील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी बी. एस. जगदाळे यांनी त्याला दि. ६ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. आरोपीच्या लैंगिक क्षमतेची चाचणी करावयाची आहे. त्याने गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करावयाचे आहे. त्याने समाज माध्यमांत छायाचित्र प्रसारित केली का? तसेच त्याचे आणखी कोणी साथीदार आहेत का? यादृष्टीने तपास करावयाचा असल्याने पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील कविता कांबळे यांनी केली.