मी सोन्याची रिंग देणार ...! विद्यार्थिनीशी अश्लील कृत्य करणारा क्लास चालक गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 12:30 IST2025-10-11T12:26:51+5:302025-10-11T12:30:53+5:30

तू शिकवणी वर्गात प्रवेश घेतल्यापासून मला आवडते. मी शाळा सुरू करणार आहे. तू शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी तुला शाळेत नोकरी देणार आहे, तसेच तुला मी सोन्याची रिंग देणार आहे’, असे सांगून रौंदळने मुलीशी अश्लील कृत्य केले. घाबरलेल्या मुलीने ही गोष्ट तिच्या कुटुंबीयांना सांगितली

Pune Crime Class teacher arrested for sexually assaulting student | मी सोन्याची रिंग देणार ...! विद्यार्थिनीशी अश्लील कृत्य करणारा क्लास चालक गजाआड

मी सोन्याची रिंग देणार ...! विद्यार्थिनीशी अश्लील कृत्य करणारा क्लास चालक गजाआड

पुणे : विद्यार्थिनीशी अश्लील कृत्य करणाऱ्या क्लास चालकाला स्वारगेट पोलिसांनी अटक केली. सुरेश दौलत रौंदळ (४६, रा. गौरव राज बिल्डिंग, दत्तनगर, आंबेगाव, कात्रज) असे अटक करण्यात आलेल्या क्लास चालकाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित मुलगी ही सुरेश रौंदळ याच्याकडे शिकवणीसाठी यायची. स्वारगेट भागात रौंदळ हा खासगी ट्युशन क्लास चालवतो. गुरुवारी (दि. ९) सकाळी पावणेआठच्या सुमारास मुलगी क्लासमध्ये एकटीच होती. त्यावेळी आरोपी रौंदळ याने मुलीशी संवाद साधला.

‘तू शिकवणी वर्गात प्रवेश घेतल्यापासून मला आवडते. मी शाळा सुरू करणार आहे. तू शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी तुला शाळेत नोकरी देणार आहे, तसेच तुला मी सोन्याची रिंग देणार आहे’, असे सांगून रौंदळने मुलीशी अश्लील कृत्य केले. घाबरलेल्या मुलीने ही गोष्ट तिच्या कुटुंबीयांना सांगितली. या घटनेची माहिती मिळताच सहायक निरीक्षक राहुल कोलंबीकर, उपनिरीक्षक पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. आरोपी रौंदळ याला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याच्याविरोधात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो), तसेच विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. आरोपीला अटक करण्यात आली असून, पुढील तपास उपनिरीक्षक पाटील करत आहेत.

Web Title: Pune Crime Class teacher arrested for sexually assaulting student

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.