Pune Crime : पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर बेपत्ता मजुराचा मृतदेह सापडला; पोलिसांकडून तपास सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 13:37 IST2026-02-27T13:37:11+5:302026-02-27T13:37:21+5:30

अपघाती मृत्यू की अन्य काही कारण, याबाबत तपास सुरू आहे.

Pune Crime Body of missing laborer found at Sinhagad Fort in Pune; Police investigating | Pune Crime : पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर बेपत्ता मजुराचा मृतदेह सापडला; पोलिसांकडून तपास सुरू

Pune Crime : पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर बेपत्ता मजुराचा मृतदेह सापडला; पोलिसांकडून तपास सुरू

पुणे - सिंहगड किल्ला परिसरात कामासाठी आलेल्या एका मजुराचा मृतदेह शुक्रवारी सायंकाळी किल्ल्यावरील कल्याण दरवाजा जवळील दरीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृत मजुराचे नाव दशरथ शंकर धोत्रे (वय अंदाजे 35) असून ते श्रीरामपूर येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
 
दशरथ धोत्रे हे चार दिवसांपूर्वीच किल्ल्यावर ठेकेदाराकडे कामासाठी आले होते. ते त्यांच्या ४–५ सहकाऱ्यांसोबत नरवीर तानाजी मालुसरे समाधी परिसरातील पुरातत्व विभागाच्या कामावर कार्यरत होते. सर्व मजूर किल्ल्यावरच मुक्कामाला होते. बुधवारी मध्यरात्रीनंतर धोत्रे अचानक बेपत्ता झाले. सहकाऱ्यांना ते गावाकडे गेले असावेत असे वाटले, कारण त्यांच्याशी फोनवर संपर्कही झाला नव्हता. मात्र शुक्रवारी सायंकाळी पर्यटकांना कल्याण दरवाजा परिसरातील दरीत मृतदेह दिसल्याने घटनेचा उलगडा झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृत्यूचे नेमके कारण पोस्टमॉर्टेम अहवालानंतर स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. अपघाती मृत्यू की अन्य काही कारण, याबाबत तपास सुरू आहे. स्थानिक प्रशासन आणि पुरातत्व विभागाकडूनही अधिक माहिती घेतली जात असून मजुरांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

Web Title : पुणे: सिंहगढ़ किले में लापता मजदूर मृत पाया गया; जांच जारी

Web Summary : पुणे के सिंहगढ़ किले में कल्याण दरवाजा के पास दशरथ धोत्रे नामक एक मजदूर मृत पाया गया। वह बुधवार से लापता था। पुलिस दुर्घटना या साजिश की आशंकाओं के साथ मौत के कारणों की जांच कर रही है। घटना से श्रमिकों की सुरक्षा को लेकर चिंताएं बढ़ गई हैं।

Web Title : Missing Laborer Found Dead at Sinhagad Fort, Pune; Investigation On

Web Summary : A laborer, Dashrath Dhotre, working at Sinhagad Fort was found dead near Kalyan Darwaza. He had been missing since Wednesday. Police are investigating the cause of death, looking into accident or foul play possibilities. The incident raises concerns about worker safety.