शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

पुणे महानगरपालिकेतील भाजपा नगरसेवक घेणार पुरग्रस्त गाव दत्तक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 12:39 PM

भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एका महिन्याचे मानधन पुरग्रस्त निधीला दिले आहे.

ठळक मुद्देसमन्वय समितीत घोषणा: एक महिन्याच्या मानधनाची मदत

पुणे: कोल्हापूर, सांगली तसेच कोकणातही महापुराने असाधारण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यांच्या मदतीत शहर भारतीय जनता पार्टी कुठेही कमी पडणार नाही. पुरग्रस्त भागातील एक किंवा दोन गावे भाजपाचे पुण्यातील नगरसेवक दत्तक घेतील अशी ग्वाही भाजपाच्या शहर शाखेने पक्षाच्या पुरग्रस्त सहायता समितीचे संयोजक रघुनाथ कुलकर्णी यांना दिली.भाजपाच्या वतीने राज्यस्तरावर या समितीची स्थापन करण्यात आली आहे. समितीच्या माध्यमातून पुरग्रस्त भागासाठी विविध प्रकारचे मदतकार्य उभे केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून कुलकर्णी यांनी शहरातील भाजपा लोकप्रतिनिधी तसेच कार्यकारिणीची बैठक बुधवारी सकाळी घेतली. शहराध्यक्ष आमदार माधुरी मिसाळ अध्यक्षस्थानी होत्या. महापौर मुक्ता टिळक, आमदार दिलीप कांबळे, भीमराव तापकीर, विजय काळे, जगदीश मुळीक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, प्रदेश चिटणीस धीरज घाटे, इतर मागासवर्गीय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष विकास रासकर, शहर सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, दीपक मिसाळ, उज्ज्वल केसकर, गणेश घोष बैठकीला उपस्थित होते.कुलकर्णी म्हणाले, आर्थिक मदतीबरोबर पुनर्वसनाच्या कामासाठी श्रमदानाचीही गरज आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे. शहराध्यक्ष मिसाळ यांनी शहर भाजपाच्या वतीने मदतकार्यासाठी संपुर्ण सहकार्य केले जाईल असे सांगितले. भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एका महिन्याचे मानधन पुरग्रस्त निधीला दिले आहे. प्रभागस्तरीय निधीतूनही प्रत्येकी एक लाख रूपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीला देण्यात येणार असल्याचे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले. नगरसेवकांच्या माध्यमातून एक किंवा दोन गावे दत्तक घेऊ असे ते म्हणाले. मिसाळ यांनी प्रास्तविक केले. प्रदेश चिटणीस धीरज घाटे यांनी सुत्रसंचालन केले. ........आमदार मिसाळ यांनी कुलकर्णी यांच्याकडे शहर भाजपाच्या वतीने नगरसेवकांच्या मासिक मानधनाचा २५ लाख रूपयांचा धनादेश सुपूर्त केला. आमदार मुळीक यांनी वैयक्तिक दीड लाख रुपए तसेच विकास रासकर यांनी १ लाख रूपयांचा धनादेश कुलकर्णी यांच्याकडे दिला. 

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाfloodपूर