Pune Car Accident : पुण्यात कारने १२ जणांना उडवले, अपघातामधील जखमींची यादी आली समोर
By संतोष कनमुसे | Updated: May 31, 2025 22:47 IST2025-05-31T22:47:12+5:302025-05-31T22:47:33+5:30
Pune Car Accident : पुण्यात भरधाव कारने १२ जणांना उडवले. यामधील जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.

Pune Car Accident : पुण्यात कारने १२ जणांना उडवले, अपघातामधील जखमींची यादी आली समोर
Pune Car Accident : पुण्यात मध्यवर्ती भागात सदाशिव पेठेत असलेल्या भावे हायस्कूल जवळ एका कारचालकाने १२ जणांना उडविल्याची घटना शनिवारी (दि. ३१) सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास घडली. यात जखमी असलेले सर्वजण एमपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी असल्याचे निष्पन्न झाले आहे. या अपघातातील जखमींची नावे समोर आली आहेत.
जखमींची नावे-
अविनाश दादासो फाळके, प्रथमेश पांडुरंग पतंगे, संदीप सुनील खोपडे, सोनाली सुधाकर घोळवे, मंगेश आत्माराम सुरवसे, अमित अशोक गांधी, समीर श्रीपाद भालचिकर, सोमनाथ केशव मेरूकट, प्रशांत ब्रह्मदेव बंडगर, किशोर हरिभाऊ भापकर, पायल आदेश कुमार दुर्गे, गुलणाज सिराज अहमद अशी जखमी विद्यार्थ्यांची नावे आहेत.
चालक मद्यधंद अवस्थेत होता
चालक जयराम शिवाजी मुळे (वय २७, रा. बिबवेवाडी) याला विश्रामबाग पोलिसांनी ताब्यात गेतले असून तो मद्यधुंद असल्याचे सांगितले जात आहे. जखमी विद्यार्थी एका चहाच्या टपरीवर चहासाठी एकत्रित आले होते. कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने बारा जणांना धडक दिली. प्राथमिक माहितीनुसार या बारा जणांपैकी तिघांना संचेती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर अन्य नऊ किरकोळ जखमींना योगेश हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. कारचालकाची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी पोलिसांनी त्याला ससून रुग्णालयात नेले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.