शहरं
Join us  
Trending Stories
1
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
2
'Welcome my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
3
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
4
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
5
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
6
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
7
Vastu Shastra: बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवताय? घरात दारिद्र्य आणणाऱ्या 'या' ३ चुका आजच सुधारा
8
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
9
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
10
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
11
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
12
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
13
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
14
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
15
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
16
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
17
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
18
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
19
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
20
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
Daily Top 2Weekly Top 5

पुणे : आईवडिलांची निर्घृण हत्या करून मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2017 13:21 IST

शनिवार पेठ येथे आईवडिलांची निर्घृण हत्या करुन मुलाने स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

पुणे - शनिवार पेठ येथे आईवडिलांची निर्घृण हत्या करुन मुलाने स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रकाश दत्तात्रय क्षीरसागर (वय 60) आणि आशा प्रकाश क्षीरसागर (वय 55) रा 382 शनिवार पेठ अशी हत्या झालेल्या आई वडिलांच्या नावे आहेत. ही घटना बुधवारी (6 डिसेंबर) सकाळी 9. 30 वाजता उघडकीस आली. पराग प्रकाश क्षीरसागर असे मुलाचे नाव असून त्याने आईवडिलांची गळा चिरुन हत्या केल्यानंतर स्वतः च्या हातावर धारदार शस्त्रानं वार करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

स्थानिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करुन याची माहिती दिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. दरम्यान, विश्रामबाग पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी मुलाला ताब्यात घेतले आहे.

'आरोपी मुलगा मानसिक रुग्ण'

मिळालेल्या माहितीनुसार, पराग हा मानसिक रुग्ण आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मानसिक रुग्ण असल्याने त्याचे लग्न झालेले नाही. मिळेल तिथे बिगारी अथवा अन्य कामे तो करतो. गेल्या काही दिवसांपासून त्याचे वर्तन आणखी बिघडले होते. मंगळवारी (6 डिसेंबर) सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास त्याने वडिलांच्या गळ्यावर चाकूने वार करून त्यांची हत्या केली. त्यानंतर आईचा दोरीच्या सहाय्याने गळा आवळून हत्या केली.

दोघांचीही हत्या केल्यानंतर त्याने स्वतःच्या हातावर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, यातून तो बचावला. 9.30 वाजण्याच्या पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. घटनास्थळी दाखल होत पोलिसांनी परागला ताब्यात घेतले व उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल केले आहे.  

टॅग्स :MurderखूनPuneपुणे