शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
2
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
3
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
4
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
5
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
6
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
7
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
8
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
9
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
10
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
11
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
12
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
13
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
14
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
15
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
16
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
17
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
18
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
19
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
20
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी

ई-शॉपिंग कंपन्यांचे पुणे होणार आगार; दोनशे एकरमध्ये होणार अत्याधुनिक साठवणूक केंद्र

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 1:35 PM

चाकण आणि तळेगावला असेंडाज आणि हिरानंदानी ग्रुपची दोन औद्योगिक मालाची रसद पुरविणारी केंद्रे (लॉजिस्टिक सेंटर) उभी राहणार आहेत.

ठळक मुद्देदोन केंद्रांना मंजुरी : सात प्रकल्प पुण्यात, ५ हजार कायम रोजगारनिर्मिती

विशाल शिर्के पिंपरी : आगामी काही वर्षांमध्ये वेगाने वाढत असलेल्या ऑनलाईन शॉपिंग कंपन्यांच्या मालाची रसद पुण्यातून पुरविली जाणार आहे. ग्राहकांची मागणी पुरविण्यासाठी चाकण आणि तळेगाव येथे दीडशे ते दोनशे एकर जमिनीवर मोठे औद्योगिक संकुल उभारले जाणार असल्याची माहिती, उद्योग विभागाचे सहसंचालक सदाशिव सुरवसे यांनी दिली. घरगुती किराणा मालापासून इलेक्ट्रॉनिक वस्तू, टीव्ही, पादत्राणे, कपडे, पुस्तके अशा हव्या त्या वस्तू ऑनलाईन शॉपिंग कंपन्या विकत आहेत. ग्राहकांनी मागणी नोंदविल्यापासून दोन ते पाच दिवसांत या वस्तू घरपोच अथवा इच्छितस्थळी पोहचत्या केल्या जातात. या वस्तू पोहचविण्यासाठी त्या वस्तूंचा मध्यवर्ती साठा असणे गरजेचे असते. तरच, ग्राहकांना जलदगतीने वस्तू पोहचविल्या जाऊ शकतात. त्यासाठी मोठ्या आणि अत्याधुनिक औद्योगिक गोदामांची आवश्यकता भासणार आहे. यापूर्वी भिवंडीमध्ये मोठ्या प्रमाणावर मालाचा साठा केला जात होता. आता चाकण आणि तळेगावला असेंडाज आणि हिरानंदानी ग्रुपची दोन औद्योगिक मालाची रसद पुरविणारी केंद्रे (लॉजिस्टिक सेंटर) उभी राहणार आहेत. या कंपन्यांना दीडशे ते दोनशे एकर जागा मंजूर झाली आहेत. .........................

चिनी कंपनी बनविणार इलेक्ट्रिकल व्हेईकलग्रेट वॉल ही १९८४ साली स्थापन झालेली चीनची आॅटोमोबाईल कंपनी आहे. ट्रक आणि स्पोर्ट्स युटीलिटी व्हेइकल (एसयूव्ही) बनविण्यामध्ये या कंपनीचा हातखंडा आहे.या कंपनीला तळेगाव येथे जनरल मोटरर्स कंपनीचे बंद पडलेले युनिट देण्यात येणार आहे. येथे ही कंपनी इलेक्ट्रॉनिक वाहने बनविणार आहे. त्यासाठी तब्बल ३,७७० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून, २ हजार ४२ कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध होणार आहेत.

..............................

सात प्रकल्प पुण्यात, ५ हजार कायम रोजगारनिर्मितीराज्य सरकारने १६ कंपन्यांशी परस्पर सामंजस्य करार केले आहेत. त्यातील सात प्रकल्प पुणे जिल्ह्यात होणार आहेत. हंगली इंजिनिअरिंग, हिरानंदानी लॉजिस्टिक, पीएमआय इलेक्ट्रॉनिक्स, ग्रेट वॉल मोटर्स या कंपन्या तळेगावमध्ये तर, असेंडाज लॉजिस्टिक चाकण, साऊथ कोरियाची इस्टी ही इलेक्ट्रॉनिक सिस्टिम बनविणारी कंपनी रांजणगाव येथे उभारण्यात येईल. रॅक बॅक हे डाटा सेंटर हिंजवडीत उभारण्यात येणार आहे. हंगली (१५०), इस्टी (११००), पीएमआय इलेक्ट्रॉनिक्स (१५००) आणि ग्रेट वॉलमध्ये (२०४२) ४,७९२ कायमस्वरूपी रोजगार निर्माण होतील. 

टॅग्स :Puneपुणेbusinessव्यवसायShoppingखरेदीMIDCएमआयडीसीChakanचाकणTalegaon Dabhadeतळेगाव दाभाडे पोलीस