भरधाव दुचाकीची ट्रकला धडक; दुचाकीस्वार ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 20:03 IST2025-05-06T20:03:06+5:302025-05-06T20:03:40+5:30
मध्यरात्री दीडच्या सुमारास दरीपुलाजवळ त्यांच्या दुचाकीने एका ट्रकला पाठीमागून धडक दिली.

भरधाव दुचाकीची ट्रकला धडक; दुचाकीस्वार ठार
पुणे : भरधाव दुचाकीने एका ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना जांभूळवाडी परिसरात दरीपूल येथे घडली. याबाबत आंबेगाव पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद झाली आहे.
शिवाजी बबन जाधव (वय ५५, रा. आंबेगाव बुद्रुक), असे अपघातामध्ये मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत पोलिस अंमलदार केच्चांप्पा जनवाड यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार शिवाजी जाधव हे १४ एप्रिलला दुचाकीवरून घरी जात होते. मध्यरात्री दीडच्या सुमारास दरीपुलाजवळ त्यांच्या दुचाकीने एका ट्रकला पाठीमागून धडक दिली. या अपघातामध्ये जाधव गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासात दुचाकीस्वार शिवाजी जाधव हे भरधाव वेगात ट्रकला धडकल्याचे निष्पन्न झाल्याने आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.