Pune Airport News - कोणतीही हानी नाही; विमानतळ व्यवस्थापन पूर्णपणे अलर्ट मोडवर - मुरलीधर मोहोळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 11:54 IST2026-04-18T11:53:33+5:302026-04-18T11:54:19+5:30
Pune Airport News - पुणे विमानतळावर लढाऊ विमानाचा अपघात; धावपट्टी ९ तास बंद, ३० हून अधिक उड्डाणांवर परिणाम

Pune Airport News - कोणतीही हानी नाही; विमानतळ व्यवस्थापन पूर्णपणे अलर्ट मोडवर - मुरलीधर मोहोळ
पुणे - पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे शुक्रवारी रात्री भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानाला अपघात झाल्याने मोठी खळबळ उडाली. या घटनेमुळे लोहगाव विमानतळाची धावपट्टी तब्बल ९ तास बंद ठेवावी लागली. या घटनेचा थेट परिणाम विमान वाहतुकीवर झाला असून, पुण्याकडे येणारी आणि येथून उड्डाण करणारी ३० हून अधिक विमाने रद्द किंवा अन्यत्र वळवण्यात आली. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले.
दरम्यान, या घटनेनंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले की, सुदैवाने, विमानातील दोन्ही वैमानिक सुरक्षित असून कोणतीही जीवितहानी किंवा नागरी मालमत्तेचे नुकसान झालेले नाही. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात आल्या. परिस्थिती लवकरात लवकर सुरळीत करण्यासाठी मी विमानतळ संचालक आणि हवाई दलाच्या अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहे.
The runway at Pune Airport was temporarily unavailable following an incident involving an IAF aircraft.
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) April 18, 2026
Runway repair work has since been completed on a war footing, with safety maintained as the top priority throughout.
Departure operations will resume from 07:30 AM, and…
नेमकी घटना काय?
भारतीय हवाई दलाच्या सुखोई-३० एमकेआय या लढाऊ विमानाचे लँडिंगदरम्यान अंडरकॅरेज (लँडिंग गिअर) मध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे विमानाचे हार्ड लँडिंग झाले आणि ते धावपट्टीच्या मध्यभागी अडकून पडले. SATCO आणि IAF यांच्या माहितीनुसार, विमान हालचाल करण्याच्या स्थितीत नव्हते. मात्र, दोन्ही वैमानिक सुरक्षित असल्याची पुष्टी करण्यात आली आहे.
धावपट्टी बंद आणि पुन्हा सुरू
-रात्री १०:२५ वाजता घटना घडली
-NOTAM जारी करून धावपट्टी सकाळी ०५:३० पर्यंत बंद
-नंतर वेळ वाढवून ०९:०० पर्यंत बंद ठेवली
-सकाळी ०५:४५ वाजता विमान हटवण्यात आले
---
प्रस्थान उड्डाणे:
०७:३० पासून सुरू
आगमन उड्डाणे:
०८:०० पासून सुरू
यानंतर धावपट्टी सुरक्षित घोषित करण्यात आली आणि उड्डाण सेवा पुन्हा सुरळीत झाली.
-----
उड्डाणांवर परिणाम
वळवलेली उड्डाणे:
IndiGo – ८
Air India – १
Akasa Air – १
Air India Express – २
----
रद्द उड्डाणे:
IndiGo: ३५ आगमन, ३८ प्रस्थान
Air India: ३ आगमन, ३ प्रस्थान
SpiceJet: २ आगमन, ३ प्रस्थान
Akasa Air: २ आगमन, ३ प्रस्थान
Air India Express: ५ आगमन, ५ प्रस्थान
-------
प्रवाशांसाठी सुविधा
प्रवाशांच्या गैरसोयीचा विचार करून पिण्याचे पाणी, चहा, कॉफी आणि अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली. CISF आणि AAI च्या टीमने व्यवस्थापन सुरळीतपणे हाताळले.
---------
उड्डाण सेवा पुन्हा सुरू
पहिले आगमन उड्डाण (Mopa वरून Fly91): ०८:५८
पहिले प्रस्थान उड्डाण (SpiceJet 937 ते दिल्ली): ०९:१७
सध्या विमानतळावरील सेवा पूर्णपणे सुरळीत झाली आहे. विमान कंपन्यांनी प्रवाशांशी समन्वय साधून उशीर, रद्दीकरण आणि वळवलेल्या उड्डाणांबाबत माहिती दिली आहे.