Video: क्षणात घडला अपघात;नियंत्रण सुटल्याने कार नाल्यात कोसळली; काच फोडून चालकाला काढले बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 11:36 IST2026-02-06T11:32:49+5:302026-02-06T11:36:09+5:30
- यामध्ये वाहन चालक सुरक्षित असून, किरकोळ जखमी झाला आहे.

Video: क्षणात घडला अपघात;नियंत्रण सुटल्याने कार नाल्यात कोसळली; काच फोडून चालकाला काढले बाहेर
वानवडी : चारचाकी वाहन अनियंत्रित होऊन थेट भैरोबानाल्यात कोसळल्याची घटना गुरुवारी (दि. ५) सकाळी वानवडीतील गंगा सॅटेलाईट सोसायटीजवळ असलेल्या नाल्यावरील पुलाजवळ घडली. यामध्ये वाहन चालक सुरक्षित असून, किरकोळ जखमी झाला आहे.
अपघाताची माहिती कळताच गस्तीवरील पोलिस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी कार पुलाजवळ वळणावर सुरक्षा कठडे नसलेल्या भागातून वेट नाल्यात गेल्याचे दिसून आले. खिडकीची काच फोडून कारमधील चालकास एका लष्कर अधिकाऱ्याने बाहेर काढून उपचारासाठी नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल केल्याचे नागरिकांनी सांगितले.
घटनास्थळी वाहतूक पोलिसांनी वाहनाचा नंबर त्यांच्याकडील अॅपमध्ये टाकून पाहिला असता है वाहन प्रवीण जैन यांच्या नावावर असल्याचे स्पष्ट झाले. वानवडी बाजार पोलिस चौकीचे पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब वाकडे यांनी अपघाताविषयी कोणाचीही तक्रार आली नसल्याचे व कोणताही गुन्हा नोंद नसल्याचे सांगितले.