परराज्यातून महिला आणायचे, टुरिस्ट गाडीतून वेश्या व्यवसाय चालवायचे; पुण्यात दोघे अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 12:51 PM2022-03-02T12:51:08+5:302022-03-02T12:53:53+5:30

पुण्यात पोलिसांनी धक्कदायक प्रकार उघडकीस आणला...

prostitution business in a tourist car other state girls two arrested in pune | परराज्यातून महिला आणायचे, टुरिस्ट गाडीतून वेश्या व्यवसाय चालवायचे; पुण्यात दोघे अटकेत

परराज्यातून महिला आणायचे, टुरिस्ट गाडीतून वेश्या व्यवसाय चालवायचे; पुण्यात दोघे अटकेत

googlenewsNext

पुणे : मानवी तस्करी करणाऱ्यांवर होत असलेली कारवाई लक्षात घेऊन परराज्यातून महिलांना आणून टुरिस्ट गाडीतून वेश्याव्यवसाय चालवत असल्याचा धक्कदायक प्रकार सामाजिक सुरक्षा विभागाने उघडकीस आणला आहे.

कुलदीप प्रसाद मोहनप्रसाद महतो (वय २६, रा. ठाणे, मूळ गाव झारखंड) आणि जयशंकर प्रसाद रमेश साव (वय २०, रा. मुंबई, मूळ गाव झारखंड) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. विमाननगर, येरवडा भागात दोघे जण टुरिस्ट गाडीतून फिरत असून, त्याद्वारे ते वेश्याव्यवसायासाठी महिला पुरविण्याचे काम करीत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. पोलिसांनी खातरजमा केल्यानंतर या दोन संशयितांचे मोबाईल नंबर मिळविले.

बनावट ग्राहकाने त्यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा त्यांनी विमाननगरमधील ईस्ट फिल्ड हॉटेलमध्ये दोन रूम बुक करायला सांगितल्या. त्यानुसार या ग्राहकाने रूम बुक केल्या. सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, उपनिरीक्षक श्रीधर खडके, हवालदार राजेंद्र कुमावत, राजश्री मोहिते, मनीषा पुकाळे, आण्णा माने, प्रमोद मोहिते, हणमंत कांबळे, इरफान पठाण, पुष्पेंद्र चव्हाण यांनी हॉटेलजवळ सापळा रचला. दोघे जण टुरिस्ट गाडीतून दोन महिलांना घेऊन तेथे आले. ते रूममध्ये जाताना पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले.

जबरदस्ती करायचे- 

परराज्यातून मुली प्राप्त करून पुण्यामध्ये टुरिस्ट गाडी चालवत असल्याचे भासवून पीडित मुलीकडून ते जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करवून घेत होते.

Web Title: prostitution business in a tourist car other state girls two arrested in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.