शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

प्राध्यापकांचा आठवडा आता ४० तासांचा

By admin | Updated: February 4, 2015 00:16 IST

महाविद्यालय व विद्यापीठातील प्राध्यापकांना आता आठवड्यातील ४० तास कॉलेज कॅम्पसमध्ये थांबणे बंधनकारक असणार आहे.

पुणे : महाविद्यालय व विद्यापीठातील प्राध्यापकांना आता आठवड्यातील ४० तास कॉलेज कॅम्पसमध्ये थांबणे बंधनकारक असणार आहे. तसेच या कालावधीत काय कामकाज केले जाणार, याचे वेळापत्रकही त्यांना प्राचार्यांना द्यावे लागणार आहे. प्राध्यापकांनी महाविद्यालयांत किती तास शिकवावे, याबाबतचे धोरण विद्यापीठ अनुदान आयोगाने ठरविलेले आहे. त्यानुसार प्राध्यापकाने आठवड्यातून १४ तास केवळ अध्यापनाचे काम करणे बंधनकारक आहे. प्राध्यापक जर संशोधन मार्गदर्शक असतील, तर त्यांना दोन तासांची सवलत देण्यात आलेली आहे. सहयोगी प्राध्यापकाने १४ तास, तर सहायक प्राध्यापकाने १६ तास शिकविणे बंधनकारक आहे. महाविद्यालयात अध्यापनाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडविणारे इतरही अनेक उपक्रम सुरू असतात. त्यामध्ये राष्ट्रीय सेवा योजना सांस्कृतिक उपक्रम यांचा समावेश आहे. याशिवाय नॅकसह महाविद्यालयातील इतरही अनेक समित्यांचे कामकाज प्राध्यापकांना करावे लागते. या कामकाजाची बऱ्याचदा कोठेही नोंद होत नाही.प्राध्यापकांना करावे लागणारे सर्व कामकाज लक्षात घेऊन त्यांचा आठवडा चाळीस तासांचा करण्यात आला आहे.गत महिन्यात पुण्यात शिक्षण संचालक डॉ. धनराज माने व सहसंचालक डॉ. व्ही. आर. मोरे यांच्या उपस्थितीत यासंदर्भात बैठक होऊन तशी सूचना राज्यातील महाविद्यालये व विद्यापीठांना पाठविण्यात आली आहे. त्यामुळे प्राध्यापकांना आता तासिकांसोबतच इतर उपक्रमांचेही वेळापत्रक तयार करावे लागणार आहे. नागपूर येथील महालेखापालकांनी महाविद्यालयांचे आॅडिट केले आहे. यामध्ये आर्थिक बाबींसह शैक्षणिक कामकाजाचीही त्यांनी पाहणी केली. या पाहणीनंतर त्यांनी विविध सूचना सरकारला केल्या आहेत. त्याचाही आधार या नवीन निर्णयासाठी घेण्यात आला आहे. ४सध्या प्राध्यापकांना दररोज पाच तास महाविद्यालयात थांबावे लागते. त्यासाठी बहुतांश महाविद्यालयात बायोमेट्रिक मशिन्स बसविण्यात आली आहेत. ४नवीन धोरणामुळे प्राध्यापकांना दररोज साधारण साडेसहा तास महाविद्यालयात थांबावे लागणार आहे.