शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

पुण्यात येणाऱ्या मार्गांची वाहतूक कोंडी प्रथम फोडणार; खासदार डॉ. अमोल कोल्हेंचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 8:24 PM

‘‘पुणे-नाशिक आणि पुणे-नगर या मार्गांवरील वाहतुकीचा प्रश्न जटिल आहे.

ठळक मुद्देनॅशनल हायवे  आॅथोरिटीच्या अधिकाऱ्यांशी चर्चापुणे-नगर मार्गावर पॅरलल रस्त्यांची निर्मिती करून वाहतूककोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार

पुणे : जिल्ह्यातील पुणे-नाशिक मार्ग आणि पुणे नगर मार्गाचा वाहतुकीचा प्रश्न जटील आहे. तो सोडविण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जाणार आहेत. त्या दृष्टीने खेड घाटातील प्रलंबित कामे आणि नारायणगाव येथील बायपासची कामे प्राधान्याने केली जातील. तसेच, पुणे-नगर मार्गावर पॅरलल रस्त्यांची निर्मिती करून वाहतूककोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली. जिल्हा परिषदेत शुक्रवारी अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते, त्या वेळी डॉ. कोल्हे बोलत होते. ते म्हणाले, ‘‘पुणे-नाशिक आणि पुणे-नगर या मार्गांवरील वाहतुकीचा प्रश्न जटिल आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी नॅशनल हायवे आॅथोरिटीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असून वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विविध पर्यायांचा विचार सुरू आहे. खेड बायपासची कामे का रखडली, याची माहिती घेतली असून स्थानिकांशीही चर्चा करून नेमक्या काय समस्या आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला.‘‘पुणे-नाशिक मार्गावरील कोंडी सोडविण्यासाठी पुणे आणि पश्चिम भागात कोलायट्रल रस्त्यांची निर्मिती करून त्यावर कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. कारण, कोंडीवर तात्पुरता उपाय न करता भविष्यातील वाहनांची संख्या लक्षात घेऊन त्या दृष्टीने उपाययोजना आखणार आहोत.’’पुणे-नगर मार्गावरील वाघोली परिसरातील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी उड्डाणपुलांच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत. सध्या या परिसरातील लोकसंख्येची घनता बघता, चार लेनऐवजी आठ लेनची आवश्यकता आहे. संपूर्ण मार्गावर १९ उड्डाणपूल प्रस्तावित आहेत; मात्र त्याआधी या परिसरात पॅरलल रस्ते बांधून वाहतूककोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. यासोबतच पीमआरडीए हद्दीतीतील अवैध बाधकामे तसेच रेड झोनचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे कोल्हे म्हणाले.राष्ट्रीय पेयजल योजना आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून कुठल्या योजना सुरू आहेत, याची माहिती घेतली. पुढच्या आराखड्यात जवळपास २३४ योजना प्रस्तावित असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून ९ योजना प्रस्तावित आहेत. येत्या काळात त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल, असेही कोल्हे यांनी सांगितले. 

(चौकट )पर्यटनवाढीसाठी किल्ले शिवनेरीवर रोपवेचा प्रस्तावजुन्नर तालुक्यात किल्ले शिवनेरीवर पर्यटनवाढीच्या दृष्टीने रोपवेचा प्रस्ताव पीडल्ब्यूडीच्या अधिकाऱ्यांना दिला आहे. त्याचा विकास आराखडा लवकरच तयार होईल. तसेच, भक्तिशक्ती कॉरिडॉरबाबतचा आराखडाही पर्यटनमंत्र्यांसमोर मांडणार आहे. पहिल्या टप्प्यात जमिनीवरून किल्ल्यावर, असा रोपवेचा प्रस्ताव आहे.

-----------------------------------

 

टॅग्स :PuneपुणेShirurशिरुरNashikनाशिकAhmednagarअहमदनगरDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेhighwayमहामार्ग