शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
4
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
5
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
6
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
7
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
8
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
9
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
10
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
11
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
12
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
13
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
14
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
15
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
16
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
17
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
18
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
19
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
20
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 

“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2024 8:55 PM

Sharad Pawar News: महाराष्ट्रामध्ये येण्याशिवाय देशाच्या पंतप्रधानांना दुसरे काही दिसत नाही, अशी टीका शरद पवारांनी केली.

Sharad Pawar News: देशाचे प्रधानमंत्री याठिकाणी येऊन गेले. हल्ली त्यांना महाराष्ट्रामध्ये  जाण्याशिवाय त्यांना दुसरे काही दिसत नाही. चांगली गोष्ट आहे आम्ही तुमचे  स्वागत करतो. पण इथे आल्यानंतर त्यांनी काही गोष्टी बोलून दाखवल्या. ज्यावेळी संधी मिळेल, त्यावेळेला महाराष्ट्राचा हिसका हा तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार  नाही. ही आम्हा लोकांची तयारी आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी केली. 

महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार छत्रपती शाहू यांच्या प्रचारार्थ शिवशाहू निर्धार सभेत शरद पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. देशाचे  प्रधानमंत्री एखाद्या राज्यात जात असतील तर जनतेला संबोधित करतात. आम्ही लोकांनी एका काळामध्ये हे पाहिलेले आहे. पंडित जवाहरलाल नेहरू राज्यामध्ये जात असत. नेहरू आल्यानंतर लोकांना या देशामध्ये उभारणी आम्ही कशी करणार, याचे मार्गदर्शन ते करायचे. इंदिरा गांधी देशाच्या प्रधानमंत्री म्हणून  अनेकवेळा राज्यामध्ये जायच्या आणि राज्यातील गरीब लोकांची गरिबी कशी  घालवणार, यासंबंधीचे विचार मांडायच्या. हे काम प्रत्येक प्रधानमंत्र्यांनी  केले, अशी आठवण शरद पवारांनी सांगितली.

तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही

आजचे प्रधानमंत्री देशात हिंडतात. महाराष्ट्रामध्ये येतात. त्यांना दोन लोकांची आठवण प्रकर्षाने होते. एक उद्धव ठाकरे आणि दुसरे शरद  पवार. त्यांना आमच्यावर टिकाटिप्पणी केल्याशिवाय त्यांना स्वस्थ बसवत नाही. मोदी साहेब, तुम्ही महाराष्ट्रात कितीदाही आलात, महाराष्ट्रात टिकाटिप्पणी  कितीदाही केली, महाराष्ट्राच्या आणि देशाच्या महत्त्वाच्या प्रश्नांकडे  तुम्ही दुर्लक्ष केले तर हा महाराष्ट्र बोलेल नाही. पण ज्यावेळी संधी  मिळेल, त्यावेळेला महाराष्ट्राचा हिसका हा तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार  नाही. ही आम्हा लोकांची तयारी आहे, या शब्दांत शरद पवार यांनी टीकास्त्र सोडले. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारkolhapur-pcकोल्हापूरmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४