शहरं
Join us  
Trending Stories
1
"बुलडोझर कुठे चालवायचा? याचं ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
2
पहिली बँटींग, दुसरी बँटींग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
3
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
4
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
5
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
6
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
7
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
8
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
9
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
10
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
11
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
12
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
13
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
14
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
15
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
16
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
17
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
18
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
19
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
20
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 

सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी

By हणमंत पाटील | Published: May 02, 2024 10:30 PM

सांगली लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारीवरून उद्धवसेना व काँग्रेसमध्ये वाद झाला. त्यामुळे देशभर व राज्यभर सांगली लोकसभेची निवडणूक गाजली आहे. अखेर सांगलीची जागा मिळवीत उद्धवसेनेने पैलवान चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली.

सांगली : सांगली लोकसभेची निवडणूक काँग्रेसमधील बंडखोरीने चुरशीची झाली. त्यामुळे महाविकास आघाडीकडून उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. विश्वजित कदम यांची, तसेच महायुतीकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे दिग्गज नेते प्रचार सभेत उतरविले आहेत. प्रचारासाठी अवघे दोन दिवस उरल्याने दिग्गज नेत्यांच्या सभांचा धुराळा उडणार आहे.

सांगली लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारीवरून उद्धवसेना व काँग्रेसमध्ये वाद झाला. त्यामुळे देशभर व राज्यभर सांगली लोकसभेची निवडणूक गाजली आहे. अखेर सांगलीची जागा मिळवीत उद्धवसेनेने पैलवान चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवत बंडखोरी केली. दुसऱ्या बाजूला भाजपकडून सलग तिसऱ्यांदा खासदार संजय पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे भाजप व संजय पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.

सांगली लोकसभेच्या निकालावरून देशातील राजकारणात नवीन समीकरण तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सांगलीची जागा जिंकण्यासाठी महायुती, महाविकास आघाडी व अपक्ष उमेदवार यांनी दिग्गज नेत्यांना प्रचारात उतरविले आहे. आता शेवटच्या दोन दिवसांत महत्त्वाच्या नेत्यांच्या प्रचार सभा सांगली, मिरज, विटा व तासगाव या मतदारसंख्या सर्वाधिक असलेल्या भागात होणार आहेत. सांगली लोकसभेसाठी मिरजेनंतर उद्धव ठाकरे यांची दुसरी सभा गुरुवारी सांगलीत झाली. शरद पवार यांची तासगाव येथे सभा झाली. योगी आदित्यनाथ यांची सभा बुधवारी सांगलीत झाली. तर अमित शाह यांची सभा शुक्रवारी विट्यात (दि.३) आणि नितीन गडकरी यांची सभा रविवारी (दि.५) मिरजेत होणार आहे. त्यामुळे राजकीय सभानंतरचे वातावरण आपल्या बाजूने खेचण्यासाठी सर्व पक्षाचे उमेदवार व नेते कामाला लागले आहेत.

या नेत्यांच्या सभांचा धडाका... -महायुती व महाविकास आघाडीकडून राष्ट्रीय नेत्यांसह राज्यातील नेत्यांनाही सांगलीतील उमेदवारांच्या प्रचारात उतरविण्यात आले आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे कार्याध्यक्ष डॉ. विश्वजित कदम, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार संजय राऊत यांच्या सभांचा धडाका सुरू आहे. 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४SangliसांगलीAmit Shahअमित शाहSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेyogi adityanathयोगी आदित्यनाथNitin Gadkariनितीन गडकरी