शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील ऑनलाईन शिक्षणातील अडचणी सोडवणार;मुख्यमंत्र्यांचे आश्वासन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2020 19:46 IST

विद्यार्थ्यांनी दिली मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नाची समर्पक उत्तरे

ठळक मुद्देकुंभारवळण शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद, महा नेट फेज २ चे उद्घाटन 

जेजुरी : ऑनलाइन शिक्षण पद्धतीत विद्यार्थी रस घेत आहेत. मात्र, नेट मिळत नसल्याने अडचणी येत होत्या. महा नेटमुळे मोफत कनेक्टिव्हिटी मिळाल्याने या अडचणी दुर होणार आहे, असे म्हणत पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण शाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रगतीची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत घेतली. तसेच विद्यार्थ्यांच्या प्रगतीविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले.

ऑनलाइन शिक्षणातील अडचणी दूर करण्यासाठी शासनाने महानेटची मोफत सुविधा देण्याचा महत्वाकांक्षी उपक्रम राबवला आहे. यातील महा नेट फेज २ चे उदघाटन शुक्रवारी दुपारी ३.३० ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. यावेळी त्यांनी पाच जिल्ह्यातील पाच खेड्यातील शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी समजावून घेतल्या. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण गावातील शाळेतील विद्यार्थ्यांशी व शिक्षकांनी त्यांनी संवाद साधला.

कुंभारवळण जिल्हा परिषद शाळेच्या उपशिक्षिका शीतल खैरे जाधव यांनी विद्यार्थ्यांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी झूम अँपद्वारे संवाद साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाइन शिक्षण पद्धतीबाबत अडीअडचणी समजावून घेतल्या. कोरोना संकटात शाळा बंद आहेत. मात्र, विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हनून ऑनलाइन व ऑफलाईन शिक्षण पद्धतीने शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या नुसार शाळा शाळांमधून ऑनलाइन शिक्षण दिले जात आहे. ही शिक्षण पद्धतीला विद्यार्थ्यांचा किती प्रतिसाद मिळतो. विध्यार्थी यात रस दाखवतो का? यात नेमक्या अडचणी काय आहेत या विद्यार्थी व शिक्षकांकडून समजावून घेतल्या. यात येणाऱ्या अडचणी काय आहेत ते ही शिक्षकांनी शासनाकडे कळवाव्यात. जेणेकरून अजून काही बदल करता येतील. असे आवाहन ही मुख्यमंत्र्यांनी केले.

ऑनलाइन शिक्षण पद्धतीत विध्यार्थी रस घेत आहेत. मात्र नेट मिळत नसल्याने अडचणी येत होत्या. महा नेट मिळे मोफत कनेक्टिव्हिटी मिळाली. याचा फायदा शिक्षक, विध्यार्थी, ग्रामस्थ, शेतकरी सर्वानाच होणार आहे. ऑनलाइन शिक्षण पद्धतीने ग्रामीण भागातील विधर्थ्यांचा शैक्षणिक दर्जा नक्कीच उंचावणार आहे. मात्र नेट असले तरी अँड्रॉइड मोबाईल नसल्याने अडचणी आहेत. असे मोबाईल एका कुटुंबात एकच असतो, किंवा अनेकांकडे नाही. सर्व सामान्य कुटुंबाना प्रत्येकासाठी तो खरेदी करणे ही परवडणारे नाही. यामुळे इच्छा असून ही अनेक विध्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेणे अडचणीचे होत आहे, अशी माहिती शिक्षिका शीतल खैरे - जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना दिली. यावेळी पुरंदरचे गट विकास अधिकारी अमर माने, गट शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, केंद्रप्रमुख राजेंद्र जगताप, ग्रामस्थ, ग्रामसेवक, मंडळाधिकारी, आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते......... विद्यार्थ्यांनी दिली मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नाची समर्पक उत्तरेमुख्यमंत्र्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना विद्यार्थी व शिक्षकांनी समर्पक उत्तरे दिली. महा नेटची सुविधा खूप चांगली आहे. ही सेवा शासनाने ग्रामीण भागात सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने ऑनलाइन शिक्षण पद्धतीत हळूहळू आमूलाग्र बदल होईल याचा फायदा त्या त्या खेड्यांना होणार आहे. या सारख्या अद्ययावत सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन ही मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे शीतल खैरे जाधव यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडUddhav Thackerayउद्धव ठाकरेInternetइंटरनेटSchoolशाळाStudentविद्यार्थी