शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

महिला पोलिसांपुढे समस्याच

By admin | Updated: February 21, 2017 03:30 IST

मतदान साहित्याचे वाटप, मतदान केंद्रांची सुरक्षा, मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी आणि कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत

पुणे : मतदान साहित्याचे वाटप, मतदान केंद्रांची सुरक्षा, मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी आणि कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी घ्यावी लागणारी काळजी या कामांसाठी सर्व मतदान केंद्रांवर पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात महिला पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. मात्र, पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासाची, जेवणाची कोणत्याही सोयीबाबत अधिकृत सूचना देण्यात आलेल्या नाहीत. पोलीस स्टेशनकडून त्यांना याबाबतचे आदेश मिळालेले नाहीत. त्यामुळे सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस महिला पोलीस कर्मचाऱ्यांना असुविधांचाच सामना करावा लागत असल्याचे चित्र ‘लोकमत’ पाहणीतून समोर आले.१४ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सर्व मतदान केंद्रांवर पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. या महिला कर्मचाऱ्यांना दोन दिवस केंद्रावर थांबून ड्यूटी निभावावी लागणार आहे. मात्र, त्यांच्या निवासाची, भोजनाच्या व्यवस्थेला प्राधान्य देण्यात आलेले नाही. एक-दोन पोलीस स्टेशनचा अपवाद वगळता, पोलीस कर्मचाऱ्यांच्या जेवणाबाबत मुख्यालयाकडून कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे पोलीस मुख्यालय जेवणाची सोय करणार की पोलीस निरीक्षकांकडून सोय केली जाणार, याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था पाहायला मिळत आहे.(प्रतिनिधी)मागणीकडे दुर्लक्ष पोलीस कर्मचाऱ्यांसाठी एखादा वर्ग खुला ठेवावा, अशी मागणी कर्मचाऱ्यांतर्फे प्राचार्यांकडे करण्यात आली. मात्र, ती नाकारण्यात आली.  निवडणूक ड्यूटीचा शिक्षकांना किमान मोबदला मिळतो. मात्र, पोलिसांना तो मिळत नसल्याची खंतही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. ड्यूटी संपल्यानंतर शिक्षक घरी जाऊ शकतात. मात्र, मतदानपेट्या सील होईपर्यंत पोलिसांना हालताही येणे शक्य नसते. अशा वेळी, किमान सुविधा उपलब्ध असाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.इतर जिल्ह्यांतून कुमकनिवडणूक ड्यूटीसाठी हिंगोली, परभणी, अहमदनगर आदी ठिकाणांहून पोलिसांची कुमक मागवण्यात आली आहे. हिंगोलीतून २२० कर्मचारी पुण्यात आले असून, त्यामध्ये ३० महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अहमदनगरवरून २५० पोलीस कर्मचारी आले असून, त्यामध्ये ५० महिला कर्मचारी आहेत. मतदान केंद्रांवरील स्वच्छतागृहांची दुरवस्था, निवासाची गैरसोय, भोजनाबाबत अनिश्तिता अशा अडचणींचा सामना करावा लागत आहे.