शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
4
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
5
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
6
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
7
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
8
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
9
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
10
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
11
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
12
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
13
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
14
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
15
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
16
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
17
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
18
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
19
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
20
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
Daily Top 2Weekly Top 5

मसापची गोपनीयता सोशल मीडियावर

By admin | Updated: March 22, 2017 03:28 IST

एखाद्या विशिष्ट उपक्रमासाठी समीक्षक म्हणून निवड होणे ही खूप जबाबदारीची गोष्ट असते. मात्र, जर समीक्षकानेच उत्साहाच्या

पुणे : एखाद्या विशिष्ट उपक्रमासाठी समीक्षक म्हणून निवड होणे ही खूप जबाबदारीची गोष्ट असते. मात्र, जर समीक्षकानेच उत्साहाच्या भरात आपल्या समीक्षक निवडीबाबतची जाहीर घोषणा केली तर हा नक्कीच औचित्याचा भंग ठरतो. असाच काहीसा प्रताप एका पदाधिकाऱ्याच्या विशेष मर्जीतील सदस्याने करून महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या गोपनीयतेलाच ‘चपराक’ दिली आहे. समीक्षकाचे नाव अशा पद्धतीने जाहीर झाल्यास परीक्षण निष्पक्षपातीपणे होईल का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो.आयुष्यात एखादा पुरस्कार मिळाला, कुठे सत्कार झाला किंवा एखाद्या स्पर्धेत पारितोषिक मिळाले तर हा आनंद द्विगुणीत करण्यासाठी नेटिझन्सकडून सोशल मीडियावर माहिती शेअर केली जाते. त्यानंतर मग लाईक्स आणि कमेंटच्या माध्यमातून त्या व्यक्तीवर कौतुकाचा वर्षाव सुरू होतो. ते पाहून शेअर करणाऱ्या नेटिझन्सच्या मनात नक्कीच समाधानाची भावना येते. परंतु एखाद्या स्पर्धेच्या किंवा महत्वाच्या उपक्रमासाठी परीक्षक म्हणून आपली निवड झाली असल्याचे सोशल मीडियावर कधी कुणी टाकल्याचे पाहिले आहे का? मात्र साहित्य वर्तुळात लेखक आणि कवी म्हणून परिचित असलेल्या आणि साप्ताहिकातून साहित्यिक घडामोडीचा वेध घेणाऱ्या एका मसापच्या सदस्यानेच उत्साहाच्या भरात आपली वार्षिक ग्रंथ पारितोषिकासाठी ‘समीक्षक’ म्हणून निवड झाली असल्याची केवळ घोषणाच केली नाही, तर मसापकडून निवड झालेले पत्रदेखील सोशल मीडियावर टाकण्याचा प्रताप केला. (प्रतिनिधी)