शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

लसूण, वांगी, दोडक्याचे भाव उतरले

By admin | Updated: September 7, 2015 04:18 IST

मागील आठवड्याच्या तुलनेत आवक वाढल्याने रविवारी लसूण, दोडका, वांगी, हिरवी मिरची यांसह बहुतेक भाज्यांच्या भावात घट झाली.

पुणे : मागील आठवड्याच्या तुलनेत आवक वाढल्याने रविवारी लसूण, दोडका, वांगी, हिरवी मिरची यांसह बहुतेक भाज्यांच्या भावात घट झाली. तर मटारची आवक कमी झाल्यामुळे भाववाढ झाली. पालेभाज्यांचे भाव काहीसे कमी झाले असले तरी तेजीत राहिले.गुलटेकडी येथील मार्केट यार्डात रविवारी १६० ते १७० ट्रक शेतमालाची आवक झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत आवक ३० ते ४० ट्रकने वाढल्याने बहुतेक फळभाज्यांच्या भावांवर परिणाम झाला. मागणीच्या तुलनेत अधिक आवक झाल्याने लसूण, आले, दोडका, वांगी या भाज्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत प्रतिदहा किलोमागे १०० रुपयांनी उतरले. हिरवी मिरची, कारली, पावटा, भेंडी या भाज्यांचे भाव ४० ते ५० रुपयांनी उतरले आहेत. मटारच्या भावात मात्र सुमारे १०० रुपयांची वाढ झाली आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत मटारची आवक कमी झाली. बाजारात पारनेर, वाई, सातारा येथून मटारची आवक झाली. पालेभाज्यांचे भाव काहीसे उतरले असले तरी तेजीत राहिले. रविवारी बाजारात सुमारे १.२५ जुडी तर मेथीची सुमारे ५० हजार जुडी आवक झाली. कोथिंबीर व कांदापातीचे भाव ४०० ते ५०० रुपयांनी उतरले त्यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला. बाजारात इंदौर येथून ५ ते ६ टेम्पो गाजर, आंध्र प्रदेश व तमिळनाडू येथून ५ ते ६ टेम्पो शेवगा, कर्नाटक व मध्य प्रदेशातून १० ते १२ टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटकातून ५ ते ६ ट्रक कोबी व २ ते ३ टेम्पो भुईमूग शेंग, मध्य प्रदेशातून सुमारे ३ हजार गोणी लसुण आणि इंदौर व आग्रा येथून ४० ते ५० ट्रक बटाट्याची आवक झाली.स्थानिक भागातून सातारी आले ५०० ते ५५० गोणी टोमॅटो ५.५ ते ६ हजार पेटी, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, फ्लॉवर व कोबी प्रत्येकी १४ ते १५ टेम्पो, ढोबळी मिरची १० ते १२ टेम्पो, मटार ७ ते ८ टेम्पो, पावटा ५ ते ६ टेम्पो आणि तांबडा भोपळ््याची १० ते १२ टेम्पो आवक झाली. फळभाज्यांचे १० किलोचे दर :कांदा : जुना ४५०-५००, नवा ४००-४५०, इजिप्त ३८०-४००, बटाटा ८०-१००, लसूण : ५००-८००, आले : सातारी : ३००-३५०, बंगलोर २००-२५०, भेंडी : १००-१६०, गवार : गावरान व सुरती ३००-४००, टोमॅटो : ८०-१००, दोडका : ८०-१००, हिरवी मिरची : २५०-३००, दुधी भोपळा : ६०-१००, चवळी : १४०-१८०, काकडी : ८०-१२०, कारली : हिरवी : १००-१५०, पांढरी : ७०-८०, पापडी : २००-२२०, पडवळ : १४०-१६०, फ्लॉवर : ६०-१००, कोबी : ६०-१००, वांगी : ८०-१२०, डिंगरी : १४०-१६०, नवलकोल : १२०-१४०, ढोबळी मिरची : ८०-१००, तोंडली : कळी : १६०-१८०, जाड : ७०-८०, शेवगा : २५०-३००, गाजर : २००-२८०, वालवर : २४०-२६०, बीट : ६०-७०, घेवडा : १५०-२००, कोहळा : १५०-२००, आर्वी : २००-३००, घोसावळे : १४०-१५०, ढेमसे : १८०-२००, भुईमूग शेंग ४५०, मटार : स्थानिक ६५०-७००, पावटा : १५०-२००, तांबडा भोपळा : ६०-१००, सुरण २६०-२८०, नारळ : १०००-१२००, मका कणीस (शेकडा) : २००-३००. पालेभाज्यांचे शेकड्यातील दर : कोथिंबीर ५००-१०००, मेथी ५००-१०००, शेपू ३००-५००, कांदापात ५००-८००, चाकवत ३००-५००, पुदिना २००-३००, अंबाडी ४००-५००, मुळे ५००-१०००, राजगिरा ४००-५००, चवळी ४००-५००, पालक ३००-५००.