Video: माणुसकीचे दर्शन..! शिरूरमध्ये भर रस्त्यावर प्रसूती; डॉक्टरांच्या तत्परतेने वाचले माय-लेकीचे प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 13:58 IST2026-04-25T13:55:59+5:302026-04-25T13:58:28+5:30

शिरूरमध्ये भर रस्त्यावर प्रसूती; डॉक्टर सुनीता पोटे ठरल्या ‘देवदूत’

pregnant woman gives birth on road in Shirur A glimpse of humanity Delivery on the streets in Shirur; The lives of mother and daughter were saved by the promptness of doctors | Video: माणुसकीचे दर्शन..! शिरूरमध्ये भर रस्त्यावर प्रसूती; डॉक्टरांच्या तत्परतेने वाचले माय-लेकीचे प्राण

Video: माणुसकीचे दर्शन..! शिरूरमध्ये भर रस्त्यावर प्रसूती; डॉक्टरांच्या तत्परतेने वाचले माय-लेकीचे प्राण

शिरूर ( पुणे जि.) -पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात मानवतेचं हृदयस्पर्शी उदाहरण पाहायला मिळालं. शिरूर ग्रामीण रुग्णालयाजवळ एका गरोदर महिलेला अचानक प्रसूतीच्या तीव्र वेदना सुरू झाल्याने यावेळी ती रस्त्याच्या कडेला बसून मदतीची वाट पाहत होती. जोशीवाडी परिसरातील ही महिला रुग्णालयाकडे जात असताना वेदना असह्य झाल्या.

परिस्थिती गंभीर असल्याचं लक्षात येताच उपस्थित नागरिकांनी तत्काळ डॉ. सुनीता पोटे यांना संपर्क केला. या घटनेची माहिती मिळताच क्षणाचाही विलंब न करता डॉ. पोटे घटनास्थळी दाखल झाल्या. परिस्थिती पाहता तातडीने प्रसूती करणं आवश्यक असल्याचं त्यांनी ओळखलं. कोणत्याही वैद्यकीय सुविधांशिवाय, भर रस्त्यावरच त्यांनी धाडसी निर्णय घेत प्रसूती केली. या घटनेचा व्हिडिओ चर्चेत आला आहे.

दरम्यान, काही क्षण तणावपूर्ण वातावरणात सर्वजण प्रार्थना करत उभे होते. आणि अचानक नवजात बाळाच्या रडण्याचा आवाज घुमला.त्या क्षणी सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. आई आणि बाळ दोघेही सुरक्षित असल्याचं स्पष्ट होताच परिसरात आनंदाचे वातावरण पसरले. या प्रसंगात डॉ. सुनीता पोटे यांनी दाखवलेलं धैर्य, तत्परता आणि सेवाभाव यामुळे त्या खऱ्या अर्थाने ‘देवदूत’ ठरल्या. या घटनेने पुन्हा एकदा माणुसकीचं दर्शन घडवलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत असून डॉक्टरांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Web Title : डॉक्टर की तत्परता से सड़क पर माँ और नवजात शिशु की जान बची।

Web Summary : शिरूर में, एक डॉक्टर के समय पर हस्तक्षेप से सड़क पर प्रसव कराने के लिए मजबूर गर्भवती महिला की जान बच गई। डॉ. सुनीता पोटे ने बिना चिकित्सा सुविधाओं के सफलतापूर्वक प्रसव कराया। माँ और बच्चा सुरक्षित, मानवता का चमत्कार।

Web Title : Doctor's quick thinking saves mother and newborn during roadside delivery.

Web Summary : In Shirur, a doctor's timely intervention saved a pregnant woman forced to deliver on the roadside. Dr. Sunita Pote, without medical facilities, successfully delivered the baby. Mother and child are safe, hailed as a miracle of humanity.