शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

नव्या पिढीमध्ये चित्रपट संगीताचा सुवर्णकाळ घडविण्याची ताकद : अरविंद जगताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 14:20 IST

संगीताचा चेहरा जरी बदलला तरी आत्मा तोच आहे....

ठळक मुद्देज्येष्ठ चित्रपट संगीत लेखक मधू पोतदार यांच्या ‘गानगोष्टया’ पुस्तक प्रकाशन समारंभ

पुणे: मराठी भावगीत आणि चित्रपट संगीताचा सुवर्णकाळ पुन्हा घडविण्याची ताकद आजच्या नव्या पिढीच्या तरुण गीतकार आणि संगीतकाराकडे निश्चित आहे. जुना संपन्न सांस्कृतिक वारसा जपत नव्या पाऊलखुणा शोधत , हे कलावंत संगीताचा नवा इतिहास घडवित आहेत, असा आशावाद चित्रपट गीतकार अरविंद जगताप यांनी व्यक्त केला. ज्येष्ठ चित्रपट संगीत लेखक मधू पोतदार यांच्या ‘गानगोष्टया’ पुस्तकाच्या प्रकाशन समारंभी ते बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ माध्यमतज्ञ डॉ. विश्वास मेहेंदळे, महाराष्ट्र राज्य सहकारी संस्थेचे प्रमुख राज्यमंत्री दर्जा असलेले शेखर चरेगावकर, नाविन्य प्रकाशनचे नितीन खैरे,लोकमंगल ग्रूप शिक्षण संस्थेचे शिरीष चिटणीस उपस्थित होते. जगताप म्हणाले, माध्यमाच्या बदलत्या युगात संगीत कात टाकत असून, त्यात संगीताचे नव नवीन प्रवाह एकत्र येवून एका समृध्द अशा वाटचालीकडे प्रवास चालू आहे. संगीताचा चेहरा जरी बदलला तरी आत्मा तोच आहे. गानगोष्टी सारख्या पुस्तकाने मराठी चित्रपट आणि भावसंगीताच्या इतिहासाचे केलेले हे दस्ताऐवजीकरण खूप मोलाचे आहे. अध्यक्षीय भाषणात शेखर चरेगावकर यांनी याप्रकारच्या पुस्तकांचे संदर्भ मूल्य खूप मोठे आहे आणि हे पुस्तक जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोचायला हवे याकरिता  सकारात्मक प्रयत्न व्हायला हवेत. तसेच अशा प्रकारच्या  पुस्तकांना लोकमान्यते सोबत राजमान्यता मिळविण्यासाठी शासकीय पातळीवरून प्रयत्न करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.    पुस्तकाचे लेखक मधू पोतदार पुस्तकामागची भूमिका विशद करताना म्हणाले, मराठी भावसंगीत समाजाशी किती एकरूप झाले आहे याचा प्रत्यय पदोपदी मिळत गेला. वाचकांच्या प्रतिसादातूनच हे पुस्तक घडत गेल्याने मी पुस्तक हे मराठी रसिकांना अर्पण केले आहे. धनंजय कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.  

टॅग्स :Puneपुणेcinemaसिनेमाmusicसंगीत