पुणे तिथं काय उणे! दुचाकी, सोनसाखळी नाही तर यावेळी चोरट्यांनी चक्क 'पत्रपेटी'च पळविली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 18:24 IST2021-05-07T18:12:02+5:302021-05-07T18:24:20+5:30

चतु:श्रृंगी येथील सहारा हॉटेल समोरील गेली पत्रपेटीच चोरीला....

Post office letter box was stolen in Pune | पुणे तिथं काय उणे! दुचाकी, सोनसाखळी नाही तर यावेळी चोरट्यांनी चक्क 'पत्रपेटी'च पळविली

पुणे तिथं काय उणे! दुचाकी, सोनसाखळी नाही तर यावेळी चोरट्यांनी चक्क 'पत्रपेटी'च पळविली

पुणे : आजवर दुचाकी, सोनसाखळी किंवा पर्स सारख्या वस्तुंची चोरी झाल्याचे ऐकायला मिळाले आहे. पण चतु:श्रृंगी येथील सहारा हॉटेल समोरील भारतीय डाक लिहिलेली पत्रपेटीच चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरटयाविरूद्ध चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

नाथु बधे (वय 53, रा. हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मॉडर्न कॉलनी पोस्ट ऑफिस शिवाजीनगर येथे एम.टी.एस (शिपाई) म्हणून काम पाहतात. ते नेहमीप्रमाणे दि.१ मे रोजी पोस्ट ऑफिस कार्यक्षेत्रातील पत्र पेटीमधील पत्रे काढण्यासाठी सेनापती बापट रस्त्यावरील चतु:श्रृंगी येथे गेले. त्यांनी पत्रपेटीतील पत्रे काढून पेटी कुलुप लावून बंद केली.

मात्र, दोन दिवसांनी पुन्हा पत्रपेटीमधील पत्रे काढण्यासाठी गेले असता त्यांना सहारा हॉटेलच्या बाजूच्या भिंतीच्या ग्रीलला तारेने अडकवलेली लाल रंगाची लोखंडी पत्रपेटी दिसली नाही. कुणीतरी पत्रपेटी चोरून नेली असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असता अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. अविराज नरूटे पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Post office letter box was stolen in Pune