शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून शांततेचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2019 07:00 IST

आक्षेपार्ह पोस्टवर राहणार  ‘ वॉच’

ठळक मुद्देग्रुप अँडमिनला धरले जाणार जबाबदार  :निकालावर सोशल माध्यमांतून कुठल्याही प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त करु नयेत असे आवाहन

पुणे : अयोध्येतील रामजन्मभूमीच्या संदर्भात येत्या काही दिवसांत सर्वोच्च न्यायालयाकडून निर्णय जाहीर होणार आहे. यावेळी कुठल्याप्रकारची अनुचित घटना घडू नये याकरिता पुणेपोलिसांकडून नागरिकांना शांतता व शिस्त पाळण्याचे आवाहन केले आहे. पुणे शहराचे पोलीस सहआयुक्त डॉ.रवींद्र शिसवे यांनी याविषयीची अधिक माहिती प्रसिध्दीपत्रकातून दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात येणारा निकाल कुठला का असेना मात्र त्या निकालावर सोशल माध्यमांतून कुठल्याही प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त करु नयेत यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. याबरोबरच कोणत्याही धर्माच्या भावना दुखावतील अशा प्रकारचे संदेश सोशल मीडियावर प्रसिध्द होणार नाही याची काळजी घ्यावी, धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने घोषणाबाजी, जल्लोष करु नये तसेच फटाके वाजवु नयेत, मिरवणूका काढु नयेत तसेच निकालासंदर्भात अभिनंदनपर तसेच निषेध व्यक्त करणारे फलक (बँनर्स) लावु नयेत, कोणत्याही प्रकारच्या जातीय दंगलीच्या अनुषंगाने जुने व आक्षेपार्ह व्हीडीओ, फोटो पुन्हा प्रसारित करु नयेत. आक्षेपार्ह व्हीडिओ, फोटो फॉरवर्ड करु नयेत अशा प्रकारचे मेसेज फॉरवर्ड करणा-यांवर पोलिसांकडून वॉच ठेवला जाणार आहे.  प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सुचनांचे पालन न केल्यास, कुणाच्या धार्मिक भावना दुखावल्यास अथवा जातीय तणाव निर्माण केल्यास अशी व्यक्ती अथवा समुह यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे. 

* व्हाटसअप ग्रुप अ‍ॅडमिनला सुचना  अयोध्या (रामजन्म भुमी)  संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येणार असुन त्यासंदर्भात कोणतेही प्रक्षोभक विधान अथवा मॅसेज व्हाटस अप ग्रुपवर किंवा सोशल मिडीयावर येणार नाहीत, तसेच सर्व ग्रुप अ‍ॅडमिनने ग्रुपवर कुठल्याही प्रकारचे आक्षेपार्ह मेसेज येणार नाहीत किंवा ते पाठवले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. याबाबत तक्रार आल्यास मेसेज टाकणा-यासह अँडमिनवर कायदेशीर कारवाई केली जाईल. त्यामुळे सामाजिक सलोखा बिघडेल असा कोणताही मजकूर, फोटो, व्हिडीओ, प्रसारित करु नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

टॅग्स :PuneपुणेAyodhyaअयोध्याPoliceपोलिसSocial Mediaसोशल मीडियाSupreme Courtसर्वोच्च न्यायालय