शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

माजी उपमहापौराकडून पोलिसाला धमकी

By admin | Updated: September 10, 2014 00:35 IST

विसर्जन मिरवणुकीदरम्यान वाहतूक पोलिसाला मारहाण आणि धमकाविण्याच्या दोन घटना घडल्या, तर काही ठिकाणी मंडळांचे कार्यकर्ते आमनेसामने आले.

पिंपरी : विसर्जन मिरवणुकीदरम्यान वाहतूक पोलिसाला मारहाण आणि धमकाविण्याच्या दोन घटना घडल्या, तर काही ठिकाणी मंडळांचे कार्यकर्ते आमनेसामने आले. विरुद्ध दिशेने जाण्यास बंदी असतानाही त्या मार्गावरून वाहन न सोडल्याने कॅम्प भागातील एका माजी उपमहापौराने वाहतूक पोलिसाला धमकाविले. हा प्रकार पिंपरीतील साई चौकात सोमवारी रात्री नऊच्या सुमारास घडला. गणपती विसर्जन मिरवणुकीमुळे साई चौकातून कराची चौकाकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद होता. तसेच या रस्त्यावरून एकेरी वाहतूक आहे. तरीही मोटारीतून आलेल्या माजी उपमहापौराने त्या रस्त्याने आपले वाहन सोडण्याचा आग्रह धरला. पोलिसाने वाहन सोडण्यास नकार दिला. त्यानंतर ‘तुझी नोकरी घालवितो, मी कोण आहे माहिती आहे का?’ अशी धमकी माजी उपमहापौराने पोलिसाला दिली. तरीही वाहन सोडत नसल्याने माजी उपमहापौर व त्यांच्या समर्थकांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. पोलीस कर्मचाऱ्यांनी याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविले. त्यावर प्रकरण अंगलट येईल या भीतीने सर्वांनी तेथून पोबारा केला. तरीही वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी या प्रकाराबाबत स्टेशन डायरीत नोंद केली आहे. या घटनेमुळे परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.गणपती विसर्जन मिरवणुकीत वाहतूक नियोजन करीत असताना स्वप्निल शेलार या वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करून एकाला अटक केली आहे. हा प्रकार चिंचवडमधील पवना नदीघाटावर सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास घडला. अभय हस्तीमलजी गादिया (वय ४७, रा. सुदर्शननगर, दिवाकर चौक, चिंचवडगाव) याला अटक केली आहे, तर अमित राजेंद्र कांकरिया याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. नदीघाटासमोरील रस्त्यावर शेलार वाहतूक नियोजन करीत होते. आरोपींनी त्यांची मोटार रस्त्यातच आडवी लावली होती. दरम्यान, शेलार यांनी मोटार बाजूला घेण्यास सांगितले. मोटार रस्त्यातच उभी करून दोघेही मोटारीतून खाली उतरले. गादियाने शेलार यांचे दोन्ही हात पाठीमागून धरून धक्काबुक्की केली. दोघा आरोपींवर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)