शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांचा आत्मविश्वास दुणावला; पहिल्यांदाच सांगितला सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा आकडा!
2
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
3
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
4
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
5
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
6
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
7
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
8
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
9
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
10
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
11
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
12
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
13
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
14
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
15
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
16
"मला नाही वाटत आपण एकत्र काम करू शकतो..", भन्साळींनी फरदीन खानला केलं होतं रिजेक्ट, हे होतं कारण
17
विक्री वाढली, Maruti Suzukiची तिजोरी भरली; आता कंपनी देणार इतिहासातील सर्वात मोठा डिविडंड
18
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
19
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
20
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला

पोलीस ठाण्यातील मुद्देमाल होणार अत्याधुनिक मध्यवर्ती केंद्रात जतन 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 2:09 PM

पोलीस ठाण्यातील मुद्देमाल कक्ष म्हणजे एकप्रकारची अडगळीची खोली असे आतापर्यंत तिचे स्वरुप राहत आले आहे़..

ठळक मुद्देएका क्लिवर मिळणार इत्यंभूत माहिती : राज्यातील पहिलाच प्रयोग शिवाजीनगर मुख्यालयात अत्याधुनिक मध्यवर्ती मुद्देमाल केंद्र तयार खटल्याचा निकाल लागल्यानंतर त्या न्यायालयाच्या परवानगीने नष्ट करायच्या असतात़ सर्व मुद्देमाल पोलीस ठाणेनिहाय रॅक्स व बॉक्समध्ये जतन करण्यात येणार

पुणे : एखादा गुन्हा घडल्यानंतर पोलीस त्यातील आरोपी व गुन्ह्यासाठी वापरलेल्या विविध वस्तू जप्त करतात़. तो खटल्याच्या वेळी सादर करण्यासाठी मुद्देमाल कक्षात जपून ठेवला जातो़. मात्र, अनेकदा या मुद्देमालाचे व्यवस्थित जतन न झाल्याने प्रत्यक्ष काही वर्षांनी खटला सुरु झाल्यावर तो वेळेवर न सापडणे, तो खराब होणे, असे अनेक वेळा होते़ त्याचा खटल्यावरही परिणाम होत असतो़. यापुढे आता तसे होणार होणार नाही़. कारण शिवाजीनगर मुख्यालयात अत्याधुनिक मध्यवर्ती मुद्देमाल केंद्र तयार करण्यात येत आहे़. या ठिकाणी पुणे पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्यातील मुद्देमाल जतन करण्यात येणार आहे़. त्यासाठी आता स्वतंत्र अधिकारी व कर्मचारी वर्गाची नेमणूक करण्यात आली आहे़. कोथरुड पोलीस ठाण्यामध्ये तब्बल १७ वर्षे जुना तरुणाचा सांगाडा मुद्देमाल कक्षामध्ये पडून असल्याचे नुकतेच आढळून आले होते़. पोलिसांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले़. पोलीस ठाण्यातील मुद्देमाल कक्ष म्हणजे एकप्रकारची अडगळीची खोली असे आतापर्यंत तिचे स्वरुप राहत आले आहे़. अनेकदा एखाद्या खटल्यातील कागदपत्रे, जप्त केलेल्या वस्तू या पोलीस ठाण्याच्या मुद्देमाल कक्षात ठेवल्या जातात़. खटल्याचा निकाल लागल्यानंतर त्या न्यायालयाच्या परवानगीने नष्ट करायच्या असतात़. अनेकदा पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या बदल्या झाल्यावर जेव्हा खटल्याची सुनावणी सुरु होते, त्यावेळी संबंधित खटल्यातील मुद्देमाल शोधण्यासाठी पोलिसांना रजिस्टर धुंडाळावी लागतात़ अनेकदा वेळेवर कागदपत्रे न सापडणे, सापडली तर ती खराब होणे असे प्रकार घडतात़ सध्या शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये किती मुद्देमाल आहे. याची कोणतीही एकत्रित माहिती कोठेही उपलब्ध नाही़. त्यावर पुणे शहर पोलीस आयुक्तालयाने मुद्देमाल अद्ययावत ठेवण्यासाठी मध्यवर्ती मुद्देमाल कक्ष सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे़. राज्यातील हा पहिला प्रयोग असणार आहे़. या मध्यवर्ती कक्षामध्ये सर्व मुद्देमाल पोलीस ठाणेनिहाय रॅक्स व बॉक्समध्ये जतन करण्यात येणार आहे़. या प्रत्येक मुद्देमालाला क्युआर कोडाचा अवलंब केला जाणार आहे़. त्यामुळे पोलिसांना जेव्हा लागेल, त्यावेळी एका क्लिकवर संबंधित केसचा मुद्देमाल कोठे व कोणत्या रॅक्समध्ये आहे हे समजणार आहे़. न्यायालयात सादर करताना व तो परत केंद्रात जमा करताना स्वतंत्र चलन असणार आहे़ त्यामुळे सर्व मुद्देमालावर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे़. मध्यवर्ती मुद्देमाल केंद्राकरिता मोबाईल अ‍ॅप, सॉफ्टवेअर विकसित करण्यात येणार आहे़. या केंद्रात सीसीटीव्ही बसविण्यात येणार असून येथे २४ तास सशस्त्र गार्डचा बंदोबस्त असणार आहे़ या मध्यवर्ती मुद्देमाल केंद्रासाठी स्वतंत्र पोलीस अधिकारी आणि कर्मचारी देण्यात येत आहे़. त्यामुळे शहरातील सर्व पोलीस ठाण्यातील मुद्देमालाचे जतन व्यवस्थित होणार असून जेव्हा पाहिजे तेव्हा तो तातडीने उपलब्ध होणार आहे़. मध्यवर्ती मुद्देमाल केंद्रात जमा करण्यात येणाऱ्या मुद्देमालाची सर्वस्वी जबाबदारी केंद्रातील प्रभारी अधिकारी व कारकून यांच्यावर निश्चित करण्यात आली आहे़. त्यामुळे प्रत्येक पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवरील कामाचा ताण कमी होणार आहे़. ़़़* पोलिसांच्या मुद्देमाल जतन करण्याची पद्धत होणार अत्याधुनिक* जुन्या खटल्यातील मुद्देमाल एका क्लिकवर दिसणार* मुद्देमालाचे जतन एकाच पद्धतीने आणि सुसुत्रीकरण होणार* पोलीस ठाण्यांवरील ताण कमी होऊन त्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांची नजर राहणार

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसCourtन्यायालय