शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
2
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
3
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
4
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
5
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
6
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
7
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
8
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
9
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
10
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
11
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
12
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
13
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
14
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
15
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
16
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
17
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
18
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
19
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
20
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओ एजंटविरोधात पोलिसात तक्रार

By admin | Updated: February 17, 2015 01:11 IST

दुचाकीच्या नोंदणी पुस्तकावरील (आर.सी. बुक) बँकेचे नाव कमी करण्यासाठी पैशांची मागणी करणारांविरोधात प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) सोमवारी पोलिसांत तक्रार दिली आहे.

पुणे : दुचाकीच्या नोंदणी पुस्तकावरील (आर.सी. बुक) बँकेचे नाव कमी करण्यासाठी पैशांची मागणी करणारांविरोधात प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) सोमवारी पोलिसांत तक्रार दिली आहे. तसेच, कार्यालयाच्या आवारात अनधिकृत काम करताना आढळून आल्यास इतर एजंटांवरही कडक कारवाई करण्याचे संकेत अधिकाऱ्यांनी दिले आहेत.आरटीओमधील एका एजंटने दोन महिन्यांपूर्वी किरण राठोड यांच्याकडून संबंधित कामासाठी पैसे घेतले होते. याविषयी ‘लोकमत’ने सोमवारी वृत्त प्रसिद्ध केले. याची दखल घेत प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी पावले उचलत संबंधित एजंटविरोधात तक्रार घेतली. तसेच, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना बंडगार्डन पोलिसांत तक्रार करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. तसेच राठोड यांचे रखडलेले कामही प्रक्रियेनुसार मार्गी लावण्यात आले. याविषयी बोलताना पाटील म्हणाले, की सहायक अधिकाऱ्यांकडे हे प्रकरण वर्ग करण्यात आले आहे. संबंधित एजंटाविरोधात कडक पावले उचलली जातील. काही दिवसांपासून एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांकडे आधी अर्ज जमा होतो व नंतरच पैसे भरता येतात. यासाठी स्वत: उपस्थित राहणे आवश्यक आहे. कार्यालयाच्या आवारात मदत कक्षही असल्याने त्या ठिकाणी चौकशी करावी. अनधिकृत काम करणाऱ्या एजंटांविरोधात तक्रार आल्यास कारवाई केली जाईल, असे पाटील यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)एजंटकडून बोगस पीयूसी४जादा पैशांची मागणी करणाऱ्या एजंटने प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्रही (पीयूसी) बोगस दिल्याचे उघडकीस आले आहे. दुचाकीची कसलीही तपासणी न करता त्याने ‘पीयूसी’ दिले आहे. याबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालयात तक्रार देण्यात आली आहे. संबंधित एजंटकडून आणखी काही जणांना बोगस पीयूसी देण्यात आल्याची शक्यता आहे. याची दखल घेत जितेंद्र पाटील यांनी सेंटरवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.